क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे कोरोना धोका वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:16 AM2021-02-19T04:16:29+5:302021-02-19T04:16:29+5:30

शाळा भेटी टाळाव्यात : पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर : कोरोनाच्या दीर्घ विश्रांतीनंतर आता कुठे उच्च प्राथमिक व ...

A visit by field officials is likely to increase the corona threat | क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे कोरोना धोका वाढण्याची शक्यता

क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे कोरोना धोका वाढण्याची शक्यता

Next

शाळा भेटी टाळाव्यात : पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर : कोरोनाच्या दीर्घ विश्रांतीनंतर आता कुठे उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांच्या वतीने सर्व प्रकारची काळजी घेतली जात असल्याने शाळा सुरळीतपणे सुरू आहेत. मात्र, बाहेरच्या व्यक्तींचा विद्यार्थी व शिक्षकांशी संबंध येत असल्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे इतरांनी शाळा भेटी टाळाव्यात, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांना देण्यात आले.

विद्यार्थी व शिक्षक वगळता इतरांना शाळेत प्रवेश करू नये, असा शासनाचा स्पष्ट आदेश आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिक्षण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, साधनव्यक्ती शाळा भेटी देत आहेत. काही तर विद्यार्थ्यांच्या घरीसुद्धा भेट देत आहेत, अशा अधिकाऱ्यांनी कोविड चाचणी केली की नाही? हेही कोणाला माहीत नाही. त्यामुळे शाळा भेटी टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

सध्या कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. राज्य शासनाने यासाठी सावधगिरीच्या सूचनासुद्धा जारी केल्या आहेत. या काळात जास्त नागरिकांना एकत्र करणे चुकीचे व नियमबाह्य आहे. तरीही अनेक क्षेत्रीय अधिकारी शिक्षक, मुख्याध्यापकांच्या सभा आयोजित करीत आहेत, हे शिक्षक समूह संपर्कात येऊन पुन्हा मुलांच्या संपर्कात येतात. त्यामुळे या सत्रात अशा सभा टाळल्या पाहिजेत, त्याऐवजी ऑनलाइन सभा घ्याव्यात व ऑनलाइनच माहिती मागवावी, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघेटनेचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य नेते विजय भोगेकर, जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे, सरचिटणीस रवी सोयाम, कोषाध्यक्ष निखिल तांबोळी, कार्याध्यक्ष लोमेश येलमुले, महिला पदाधिकारी सुनीता इटनकर, शालिनी देशपांडे, माधुरी निंबाळकर, सुलक्षणा क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: A visit by field officials is likely to increase the corona threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.