ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : एक व्यक्ती विश्रामगृहासारख्या दिसणाऱ्या इमारतीसमोर टेबल आणि खुर्च्या टाकून काहीतरी काम करत असतो. अचानक त्याच्या दिशेने भलामोठा वाघ येतो आणि तो घाबरून उभा राहतो. तो वाघाच्या दिशेने जाऊन पळण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यातच वाघ त्याच्यावर झडप घालतो. खुर्च्या आणि टेबल अस्ताव्यस्त होतात. वाघ मनुष्याला पकडून भिंतीजवळ खाली खेचतो, त्यानंतर लगेच उभा राहून मनुष्याला जबड्यात पकडून पळून जातो. या दरम्यान, मनुष्याचा किंचनाळण्याचा आवाज ऐकू येतो.
अशा प्रकारचा व्हिडिओ सध्या सर्वत्र वेगाने व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओवर दिलेल्या माहितीनुसार, हा किस्सा ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६:४२ वाजता घडल्याचे नमूद आहे. व्हिडिओचे संदेश चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील वनविभागाच्या विश्रामगृहासमोरील असल्याचे सांगतात.
या प्रकरणाबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, अशाप्रकारची घटना प्रत्यक्षात घडलेली नाही. चंद्रपूर जिल्ह्यात वाढत चाललेल्या मानव-वन्यजीव संघर्षाचा गैरफायदा घेऊन काही समाजकंटक या प्रकारच्या माहितीचा प्रचार करून लोकांना भडकवत आहेत. तसेच, हा व्हिडिओ एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) द्वारा तयार केलेला आहे, त्यामुळे यावर कुणालाही विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले. या घटनेबाबत संबंधितांवर वनविभाग फौजदारी स्वरूपाची कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Web Summary : A viral video showing a tiger attacking a man near Chandrapur is fake. Forest officials confirm it's AI-generated and warn against spreading misinformation, threatening legal action against those responsible.
Web Summary : चंद्रपुर के पास एक आदमी पर बाघ के हमले का वायरल वीडियो नकली है। वन अधिकारियों ने पुष्टि की है कि यह एआई-जनित है और गलत सूचना फैलाने के खिलाफ चेतावनी दी है, साथ ही जिम्मेदार लोगों के खिलाफ कानूनी कार्रवाई की धमकी दी है।