शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

वाघाच्या दर्शनाने गावकरी भयभीत

By admin | Updated: February 23, 2015 01:18 IST

कोठारी वनपरिक्षेत्रातील कोठारी बिटात काटवली शिवारावर मनोहर बोरुले या शेतकऱ्याला शेतीची जागल करताना १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री वाघाने हल्ला करून ठार मारले.

कोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रातील कोठारी बिटात काटवली शिवारावर मनोहर बोरुले या शेतकऱ्याला शेतीची जागल करताना १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री वाघाने हल्ला करून ठार मारले. यामुळे ७० कुटुंबाच्या ३०० लोकात भयंकर भीती संचारली. पुन्हा १९ फेब्रुवारीच्या रात्री घटनास्थळाच्या शेजारील शेतात वाघ काही महिलांना दिसल्याने गावकऱ्यांसह शेतकरी भयभीत झाले आहेत. आता शेतकऱ्यांनी शेतीची जागल करणेही सोडून दिले आहे.मागील दोन ते तीन महिन्यापासून या भागात वाघ, बिबट, आदी हिस्त्र प्राण्यांनी हैदोस घातला होता. यात बैल, गाय, शेळ्या व कुत्र्यांना जंगली प्राण्यांनी शिकार केली. रानटी डुकरांनी व सांबर, चितळांनी उभ्या पिकाची नासाडी केली आहे. याबाबत वनविभागाला वेळोवेळी सूचना करुन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मात्र गावात फटाके फोडणे व गस्त करण्यापलिकडे कुठलीही ठोस उपाययोजना वनविभागाने केली नाही. परिणामी जागल करणाऱ्या शेतकऱ्यास जिवानीशी मुकावे लागले. घरचा कर्ता पुरुष हिराविल्याने बोरुले कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या मयुरी नामक मुलीचे नुकतेच लग्न जुळले असून मुलीचे लग्न कसे करायचे, हा प्रश्न मृत मनोहरची पत्नी सुनितासमोर उभा ठाकला आहे. आता शेतीचे कितीही नुकसान होवो, मात्र जीव वाचला पाहिजे, अशा प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत. (वार्ताहर)वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कराशेतकऱ्यांना शेतीची राखण करण्यासाठी शेतात मचानी उभाराव्या लागतात. मात्र लाकडी मचानी उभारण्यासाठी जंगलातील लाकूड आणण्यास वनविभागाने मज्जाव केल्याने जमिनीवर झोपडी करुन शेतीची राखण करावी लागत आहे. शेतकऱ्यांना शासनाने लोखंडी मचानी पुरवाव्या व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जि.प. सदस्य चंद्रकांत गुरु, राजू बुद्धलवार, मोरेश्वर लोहे, शैलेश रामटेके, सरपंच माधुुरी ढुमणे यांनी केली आहे.घटनास्थळावर वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी तीन कॅमेरे लावण्यात आले असून रात्री कॅमेरात वाघ आला नाही. मात्र गावकरी वाघ दिसल्याचे सांगत असल्याने पुन्हा कर्मचाऱ्यांची गस्त वाढवून कॅमेरे विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत. वाघाला पकडण्यासाठी वरिष्ठाकडे मंजुरी मागितली आहे. ती मिळताच पिंजरे लावून वाघाला पकडण्यात येईल.- संजय भंडारी, वनाधिकारी, कोठारी.