शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्तरावरच सोडविणार पीडितांचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

महिलांमध्ये जागृती नसल्यामुळे अत्याचार होतो.  मात्र, कुठे दाद मागावी याची जागृती नसल्याने अन्याय सहन करावा लागतो. यासाठी राज्य महिला आयोगाने राज्यभरात जनसुनावणी घेणार आहे, अशी माहिती अध्यक्ष चाकणकर यांनी दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटीदरम्यान चाकणकर यांनी बल्लारपुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिलेच्या तक्रारीची विचारणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्याने दुर्गम भागातील महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी तिथे शक्य होत नाही. त्यामुळे ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत राज्यातील पहिली जनसुनावणी चंद्रपुरात झाली. अशा जनसुनावणीतून महिलांचे प्रश्न स्थानिक स्तरावरच यापुढे सोडवू, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी नियोजन भवनात दिली.मंचावर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर उपस्थित होते.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर म्हणाल्या, अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम पोलीस महासंचालकांना शिफारस करून सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी निर्भया पथक, दामिनी पथक, भरोसा सेल सोबतच महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन  सुरू करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थिनी व कामासाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण  मोठे आहे. महिलांमध्ये जागृती नसल्यामुळे अत्याचार होतो.  मात्र, कुठे दाद मागावी याची जागृती नसल्याने अन्याय सहन करावा लागतो. यासाठी राज्य महिला आयोगाने राज्यभरात जनसुनावणी घेणार आहे, अशी माहिती अध्यक्ष चाकणकर यांनी दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटीदरम्यान चाकणकर यांनी बल्लारपुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिलेच्या तक्रारीची विचारणा केली.  या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले असून चार्जशीट तयार झाली. सरकारी वकिलासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केल्याचे पोलीस अधीक्षक साळवे यांनी सांगितले.  

गावात बालविवाह झाल्यास सरपंचांचे पद रद्द- कोरोना कालावधीत मुलींचे बालविवाह वाढले. ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह होईल तेथील सरपंच व विवाह नोंदणी अधिकाऱ्यावर कारवाई करून दोष सिद्ध झाल्यास पद रद्द करावे, अशी शिफारस आयोगाने राज्य सरकारकडे केल्याचे अध्यक्ष चाकणकर यांनी सांगितले.

टोल फ्री क्रमांकावर नोंदवा तक्रारकोरोनामुळे रोजगार बंद झाले. यातून नैराश्य व कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली. अशा घटना रोखण्यासाठी शहरी भागात १०९१ तर ग्रामीण भागासाठी ११२ हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू झाला आहे.

५० महिलांनी मांडल्या समस्यासुनावणीदरम्यान ५० महिलांनी आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासमोर समस्या मांडल्या. तीन प्रकरणात समझोता होऊन प्रश्न निकाली काढण्यात आयोगाला यश मिळाले. समझोता झालेल्या कुटुंबीयांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकर