लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामामध्ये नुकसान झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात भाजीपाल्याची लागवड केली. मात्र उत्पादन झाल्यानंतर भाजीपाल्याचे भाव उतरल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.जिल्ह्यात या वर्षी टमाटर, कोबी, पालक, मेथी आणि वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. हा भाजीपाला बाजारात आला आहे. एकाच वेळी मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामुळे भाजीपाल्याचे दर घरसले आहेत. याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. टमाटर उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीकरिता येणाºया टमाटरला मजुरीचे पैसे निघणेही अवघड आहे. १० रूपयात दोन किला टमाटर बाजारात विकले जात आहे. कॅरेटला २० ते ५० रूपयांचाच दर मिळत आहे. मजुरीचे दर मात्र शंभर ते दोनशे रूपये आहे. यामुळे टमाटर उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे. अशीच अवस्था वाग्यांची आहे.मागणीच्या तुलनेत वांग्यांची आवक वाढली आहे. ५० ते शंभर रूपयाला २० किलो वांग्यांची पत्री विकली जात आहे. कोथिंबीरीचे दरही असेच पडले आहेत. यामुळे बैभाव भाजीपाला विकला जात आहे. एक कट्टा कोबी केवळ ८० ते १०० रूपयाला किली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
भाजीपाल्याचे दर घसरले उत्पादक शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST
जिल्ह्यात या वर्षी टमाटर, कोबी, पालक, मेथी आणि वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. हा भाजीपाला बाजारात आला आहे. एकाच वेळी मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामुळे भाजीपाल्याचे दर घरसले आहेत. याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. टमाटर उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
भाजीपाल्याचे दर घसरले उत्पादक शेतकरी संकटात
ठळक मुद्देखरीप नंतर रबी पिकालाही फटका : लसनाचे दर तेजीत