लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परिणामी भाजीपाल्याच्या आवकेत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. दैनंदिन आहारातील वांगी, गवारी, मेथी, पालक, भेंडीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. संपूर्ण उन्हाळाभर दरातील वाढ कायमच राहणार असून अनेक भाज्या मिळणेही जिकरीचे होणार आहे.उन्हाळ्याची तिव्रता वाढत असली तरी गेल्या आठवड्यापर्यंत त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाला नव्हता. आता मात्र प्रथमच उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. शिवाय त्यांच्या आवकेवरही परिणाम झालेला आहे. सर्व फळभाज्यांचा दर सरासरी ६० ते ८० रुपयांपर्यंत गेला आहे. शहरातील अनेक आठवडी बाजार दुपारपासून सुरू होतात. मात्र उन्हाची तिव्रता वाढत असल्याने ग्राहक सायंकाळीच भाजीपाला खरेदीसाठी प्राधान्य देताना दिसत आहेत.
भाजीपाल्याचे दर वाढले, आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:23 IST
उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परिणामी भाजीपाल्याच्या आवकेत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. दैनंदिन आहारातील वांगी, गवारी, मेथी, पालक, भेंडीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.
भाजीपाल्याचे दर वाढले, आवक घटली
ठळक मुद्देपुन्हा दरवाढीची शक्यता : बाजारावर परिणाम