चंद्रपूर : यशवंतनगर पडोली येथील वैदेही लोया हिने अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत कोणत्याहीप्रकारचा शिकवणी वर्ग न लावता निट परीक्षेत यश प्राप्त केले. तिला नागपूर येथील एम्स मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला आहे. तिच्या यशाबद्दल पडोली पोलीस स्टेशनतर्फे तिचा सत्कार करण्यात आला.
जुगलकिशोर लोया यांचा चाय टपरीचा व्यवसाय असून, त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांची मोठी मुलगी वैदेही हिला डॉक्टर बनायचे असल्याने तिने स्वत:च घरी अभ्यास करून निट परीक्षेत ६६४ गुप्त प्राप्त करून नागपूर येथील एम्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला आहे. घरी कुणीही उच्चशिक्षित नाही. परंतु, जिद्द व सातत्यपूर्ण अभ्यासातून वैदेहीने यश प्राप्त केले. तिच्या यशाबद्दल वैदेहीचा सन्मान करण्यात आला. यावेळी पडोली पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.