मागील दोन आठवड्यांपासून गोवरी गावात तापाची साथ सुरू असल्यामुळे आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ॲन्टिजन तपासणी शिबिरात तीन दिवसानंतर जवळपास ५७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. गोवरी येथे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत कोरोनाबाधित असल्याने एकच खळबळ उडाली. आरोग्य विभागाने ५८ बाधितांना विसापूर येथील सन्मित्र सैनिकी विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ पाठविण्यात आले होते. तपासणी शिबिरात तीन दिवस राहून गावातील नागरिकांची तपासणी करविण्यासाठी जनजागृतीपासून ते कोणतीही गरज पूर्ण करण्याचे कार्य सरपंच आशा उरकुडे व त्यांचे पती शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे दाम्पत्याकडून करण्यात आले. सन्मित्र सैनिकी विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या बाधितांना खोकल्याच्या त्रास जाणवत असल्याची माहिती मिळताच बबन उरकुडे यांनी डॉ. दुधे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी स्वखर्चातून ग्लिसरीन व खोकल्याचे औषध मिळवून दिले. कोविड नियमांचे पालन करीत सोशल डिस्टन्सिंग ठेवत कोविड सेंटरला भेटीदरम्यान औषधाव्यतिरिक्त सर्वांसाठी जवळपास १०० नारळ पाणीसुद्धा देण्यात आले.
कोविड रुग्णांच्या मदतीसाठी सरसावले उरकुडे दाम्पत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST