चिमूर, नागभीड तालुक्यात युरिया खताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:00 AM2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:33+5:30

नागभीड तसेच चिमूर तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी नागभीड तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. तर चिमूर तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. यावर्षी सुरूवातीला पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली होती.

Urea fertilizer shortage in Chimur, Nagbhid taluka | चिमूर, नागभीड तालुक्यात युरिया खताचा तुटवडा

चिमूर, नागभीड तालुक्यात युरिया खताचा तुटवडा

Next
ठळक मुद्देधानपिकासाठी शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड / नेरी : सद्यस्थितीत धान पिकाला युरीया खताची आवश्यकता असताना नेमक्या याचवेळी युरीया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकरी खताची खरेदी करीत आहे. यामध्ये मात्र शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
नागभीड तसेच चिमूर तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी नागभीड तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. तर चिमूर तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. यावर्षी सुरूवातीला पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली होती. मात्र त्यानंतर हंगामयोग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी रोवणे केले आहे.
रोवणे आटोपल्याने आणि पाऊसही धान पिकास पूरक असल्याने सद्यस्थितीत धानाचा हंगाम अतिशय भरात आला आहे. या पिकास आता युरीया खताची आवश्यकता आहे. नेमक्या याचवेळी बाजारात युरीय खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
शेतकरी खत खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात जात आहे. मात्र कृषी केंद्र संचालकांकडे युरीया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
स्थानिक कृषी केंद्र संचालकांना विचारणा केली असता, तालुक्यात खतांचा पुरवठा कमी झाल्याचे सांगितले. यासंदर्भात तालुका कृषी अधिकाºयाकडे संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

मागील काही दिवसांपासून नागभीड येथे युरीया खताची टंचाई आहे. कृषी केंद्र संचालकांकडे युरीया खत घेण्यासाठी गेल्यानंतर खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मागील काही दिवसांपासून हिच स्थिती असल्यामुळे धान पिकांना कोणते खत द्यायचे हा प्रश्न आहे.
- संजय माकोडे
शेतकरी, मांगली

Web Title: Urea fertilizer shortage in Chimur, Nagbhid taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती