शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाशातून पडलेल्या वस्तूंचा होणार उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 09:54 IST

अवकाशातून पडलेल्या तप्त वस्तू नक्की कशाच्या व कशामुळे पडल्या, याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

चंद्रपूर : शनिवारी रात्री सिंदेवाही तालुक्यात अवकाशातून गोलाकार रिंग व धातूचे सिलिंडर कोसळले. याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्याशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले हे अवशेष संबंधित पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आले आहे. इतर ठिकाणी अशा आणखी वस्तू आढळल्यास कदापि स्पर्श करू नये. तसेच सेल्फी घेण्याचे टाळावे. याबाबत तत्काळ जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहनही गुल्हाने यांनी केले आहे.अवकाशातून पडलेल्या तप्त वस्तू नक्की कशाच्या व कशामुळे पडल्या, याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

पाचवे सिलिंडर सापडलेब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात अवकाशातून पडलेले रॉकेट सिलिंडर सापडणे सुरूच आहे. आतापर्यंत चार सिलिंडर सिंदेवाही तालुक्यात सापडली. पाचवे सिलिंडर ब्रह्मपुरी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या बोदरा किटाळी येथे  जंगलात सापडले. मोहफुले गोळा करायला गेलेल्या बोदरा येथील नागरिकांना हे सिलिंडर दिसले. सर्व पाचही सिलिंडर गोलाकार आकारातील आहेत. आणखी किती अवशेष आकाशातून कोसळले याचा नेमका अंदाज आलेला नाही. या अवशेषाबाबतचे रहस्य मात्र अद्यापही उलगडलेले नाही. अवकाशातून पडलेल्या या वस्तू सॅटेलाइटचे अवशेष असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र