शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून दोन लहान भावांनी मोठ्या भावाला डिझेल टाकून पेटविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 14:18 IST

कौटुंबिक वादातून दोन सख्या लहान भावांनी मोठया भावाला डिझेल टाकून पेटविले. ही घटना रविवारी गडचांदूर येथील मुक्तीधाम परिसरात घडली.

ठळक मुद्देकौटुंबिक वादातून घडली घटना

चंद्रपूर : गडचांदूर येथील मुक्तीधाम परिसरात दोन सख्या लहान भावांनी मोठ्या भावाला डिझेल टाकून पेटविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मोठा भाऊ गंभीर जखमी असून त्याला उपचारार्थ चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

रवी उर्फ रोहिदास रामजी मूनेश्वर (३८), अमृत रामजी मूनेश्वर (३०) अशी आरोपींची नावे असून रामजी मूनेश्वर (४६) असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. रविवारी सकाळच्या सुमारास लहान मुलांवरुन आरोपी व जयदेवच्या पत्नींमध्ये  वाद झाला. त्यानंतर रवी मुनेश्वर व अमृत मुनेश्वर या दोन्ही भावांनी राग मनात ठेवून जयदेव शेतातून आल्यावर त्याच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले.

जयदेवची किंकाळी ऐकताच त्याचा मुलगा व पत्नी धावत आले, त्यांनी तत्काळ आग विझवली. त्यानंतर जखमी जयदेवला प्रथम गडचांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. 

या घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून रवी आणि अमृत या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी