शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

दुचाकीस्वारांना दंड, गर्दीचा प्रशासनाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. लगेच मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्याला केवळ ५० नातेवाईकांनाच परवानगी आहे. याचे पालन न झाल्यास विवाह सोहळ्याचे आयोजक आणि मंगल कार्यालय संचालकावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात एका मंगल कार्यालयावर अशी दंडात्मक कार्यवाही देखील झाली आहे. मात्र कोरोनाच्या उद्रेकाची सर्वाधिक भीती सार्वजनिक ठिकाणी आहे.

ठळक मुद्देकोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासनाची केविलवाणी धडपड

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्याच्या उंबरठ्यावर येताच जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले. ही लाट थोपविण्यासाठी गर्दीला मास्क आणि सोशल डिस्टनसिंग अनिवार्य करतानाच विना मास्क दुचाकीस्वारांना चौकाचौकात अडवून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. मात्र विनामास्क शहरात वावरणारी गर्दी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या नियमांना ठेंगा दाखवत आहे. या गर्दी कुणाचाही वॉच तर नाहीच, भुर्दंडही नाही. ऑटो व बसमधील विनामास्क प्रवाशीही दुर्लक्षित असल्याची धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये पुढे आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. लगेच मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्याला केवळ ५० नातेवाईकांनाच परवानगी आहे. याचे पालन न झाल्यास विवाह सोहळ्याचे आयोजक आणि मंगल कार्यालय संचालकावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात एका मंगल कार्यालयावर अशी दंडात्मक कार्यवाही देखील झाली आहे. मात्र कोरोनाच्या उद्रेकाची सर्वाधिक भीती सार्वजनिक ठिकाणी आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या चंद्रपूर महानगरासह तालुका मुख्यालय असलेल्या शहरातील बाजारपेठेत बिनदिक्कतपणे गर्दी वावरत आहे. सोशल डिस्टनसिंग तर दूरच साधे मास्कही लावलेले दिसून आले नाही. बसस्थानकावर बाहेर जिल्ह्यातील प्रवासी ये-जा करीत आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसले नाही. मात्र या ठिकाणी जिल्हा वा स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून आली नाही. ऑटोतूनही विना मास्क प्रवास सुरू आहे. इतकेच नव्हे तर कुणाच्याही चेहऱ्यावर कारवाईची भीतीसुद्धा नाही. केवळ दुचाकीने विना मास्क जाणाऱ्यांना प्रशासन टार्गेट करून असल्याची बाब निदर्शनास आली. 

कोरोनाचे सावट तरीही भीतीचा लवलेश नाहीचंद्रपूर जिल्ह्याच्या उंबरठ्यावर कोरोनाने दस्तक दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता आहे. मात्र नागिरकांमध्ये याबाबींची गांभिर्यता दिसून आली नाही. प्रशासनही कोरोना नियमाचा पाढा वाचून मोकेळे झाल्याचे चित्र चंद्रपूरसह जिल्ह्यात बघायला मिळाले.

गर्दीच्या ठिकाणी मास्क नसल्यास कारवाई होणारमहाराष्ट्रामध्ये पुन्हा कोरोना नव्याने डोके वर काढू पाहतो आहे. अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतो आहे; परंतु लोकांचे मास्क वापरणे, गर्दी टाळणे याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना वाढत असेल तर याला आपणच जबाबदार असेल. आम्ही नवे घोष वाक्य दिले आहे ते म्हणजे ‘कोरोना वाढीस मीच जबाबदार’. असे म्हणण्याची पाळी आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला नम्रपणे आवाहन करतो आहे की, माझे कुटुंब माझी जबाबदारी समजून या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. परिस्थिती आटोक्यात आहे; परंतु सर्वांनी काळजी नाही आणि सरकारच्या निर्देशाचे पालन केले नाही तर नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अन्यथा मास्क न वापरता गर्दीच्या ठिकाणी आढळल्यास कारवाईचे निर्देशसुद्धा प्रशासनाने दिले आहे.                        

- विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर 

ग्राहकांसह दुकानदारही विनामास्कशहरात विना मास्क लावून असंख्य लोक बिनदिक्कतपणे फिरताना आढळून आले. अनेक दुकानदारही विना मास्क होते. त्यांच्या समोर उभे असलेले ग्राहकही विनामास्क असल्याचे दिसून आले. कुणाच्याही चेरह्यावर कोरोनाची भीती जाणवत नव्हती.

प्रशासनाचा वचक कमीशहरात फिरणाऱ्या नागरिकांमध्ये कोरानाबाबत गांभिर्य निर्माण करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचा प्रत्यय ठिकठिकाणी आला. विना मास्कप्रकरणी केवळ दुचाकीस्वारांवर २०० रुपयांचा दंड ठोठावला जात होता.

बंगाली कॅम्प व जनता काॅलेज चौकातच दंड वसुलमंगळवारी भल्या पहाटे पोलीस बंगाली कॅम्प व जनता काॅलेज चौकात उभे होते. सोबत २०० रुपयांची पावती फाडणारे एक-दोन कर्मचारी होते. ही कार्यवाहीही थातुरमातूरच होती. अनेकजण पोलिसांना ठेंगा दाखवून सुसाट निघून जात होते. पोलिसांसमोरून दुचाकीवर तीन जण बसून जात होते. डझनभर पोलीस असूनही अनेकजण विनामास्क जात होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस