नागभीड : विरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची एकमेकांना जोरदार धडक बसल्याने सहा जण जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोहाळीजवळ घडला.नागभीडकडून एम.एच. २७ एक्स ३३०० हा ट्रक सिलिंडरचे रिकामे हंडे घेऊन नागपूरकडे जात होता. तर कान्पाकडून एम.एच. ३१ पी.क्यू. ३३५ हा ट्रक गिट्टी घेऊन नागभीडकडे येत होता. मोहाळीजवळ या दोन ट्रकमध्ये जोरदार टक्कर झाली. या अपघातात सहा जण जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. जखमीमध्ये अरूण मुळे (४०) रा. बाम्हणी, प्रकाश गजभे (३०) रा. बाम्हणी, सय्यद शकील (२२) रा. अमरावती यांचा समावेश असून या तिघांनाही उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. तर गुरुदास ठपरे (३५) रा. बाम्हणी, राजहंस अलोणे (५०) रा.कान्पा, गोपाल गेडाम (५०) रा. बिकली यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (तालुका प्रतिनिधी)
दोन ट्रकमध्ये धडक, सात जखमी
By admin | Updated: May 18, 2015 01:23 IST