शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दाेन हजार किमी गेली वाघोबाची स्वारी... कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 06:47 IST

चार राज्यांतून रस्ते-नद्या-गावं ओलांडत अडथळ्यांचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी येथील ताडोबाच्या लँडस्केपमधील एका नर वाघाने चार राज्यांची जंगले पार करीत सुमारे दोन हजार किमी प्रवास केल्याचे समोर आले आहे. ओडिशाच्या जंगलात हा वाघ दिसल्याची माहिती एका वन अधिकाऱ्याने दिली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आला. सुरक्षित प्रदेश व जोडीदाराच्या शोधात या वाघाचे स्थलांतर झाल्याचा अंदाज आहे.

या वाघाला रेडिओ-कॉलर नव्हता; पट्ट्यांच्या पॅटर्नवरून तो ताडोबातील असल्याची ओळख पटली. 

वाघ ताडोबातून सिंदेवाही तालुक्यात आला असावा व येथून त्याने ओडिसा गाठलेले आहे. वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट डेहराडून यांनी या वाघाची पुष्टी केलेली आहे.- दीपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रह्मपुरी.

अशी पटली ओळख nवाघाने सप्टेंबरमध्ये गजपती भागात पशुधनाची शिकार केली. त्यानंतर तेथे कॅमेरे लावण्यात आले. त्यात पट्टेदार वाघ दिसल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ भारतीय वन्यजीव संस्थेला संपर्क केला.n त्यांना कॅमेरात टिपलेले फाेटाे पाठविले. ते पाहून संस्थेने वाघाची ओळख पटविली. प्रत्येक वाघाचे पट्टे वेगळे असतात. संस्थेने याच वाघाची माहिती २०२१ मध्ये नाेंदविली हाेती.

यापूर्वीदेखील एका वाघाचा ३०००, किमीचा प्रवासयापूर्वी टिपेश्वर (जि. यवतमाळ) येथील कॉलर आयडी असलेला वाघ तेलंगणात जाऊन पुन्हा महाराष्ट्रात आला होता. त्याने तीन हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. अखेर हा वाघ बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला होता.

विदर्भातील वाघ ओडिशामध्ये गेल्याची ही पहिलीच नाेंद आहे. तो बहुतांशी जाेडीदाराच्या शाेधात आला असावा. - आनंद एस.  डीएफओ, परलेखामुंदी, ओडिशा

वाघांची संख्यामहाराष्ट्र     ४४४ओडिशा     २०छत्तीसगड     १७आंध्र प्रदेश      ६३

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर