शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur news Metal boll: चंद्रपूरमध्ये अवकाशातून पडलेले पुन्हा दोन सिलिंडर आढळले, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 09:31 IST

Chandrapur news Metal boll: खळबळ उडवून देणाऱ्या घटनेतील आणखी दोन सिलिंडर सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही कोटा व आसोला मेंढा तलाव  येथे आढळले आहेत. तालुक्यात असे किती अवशेष विखुरले असतील, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) : खळबळ  उडवून देणाऱ्या घटनेतील आणखी दोन सिलिंडर सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही कोटा व आसोला मेंढा तलाव  येथे आढळले आहेत. तालुक्यात असे किती अवशेष विखुरले असतील, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. शनिवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील लाडबोरी येथे अवकाशातून आठ फुटाची रिंग कोसळली होती. तालुक्यात अन्यत्र संयंत्राचे भाग विखुरलेले असल्याची दाट शक्यता होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुंजेवाही परिसरातील पवनपार व मरेगाव येथे दोन  अवशेष आढळून आले होते. हे गोलाकार सिलिंडर होते. दरम्यान, सोमवारी पुन्हा गुंजेवाही कोटा येथील बालाजी मंदिराच्या मागे तिसरा गोलाकार सिलिंडर मिळाला आणि लगेच काही अंतरावर असलेल्या आसोला मेंढा तलावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना चौथा सिलिंडर मिळाला. 

निरीक्षणासाठी शास्त्रज्ञ अद्याप आलेच नाहीतशनिवारपासून अवकाशातून पडलेले अवशेष सिंदेवाही पोलीस ठाण्यात आहेत. याचे निरीक्षण करण्यासाठी भौगोलिक शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आले असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत कुणीही आले नव्हते. विशेष म्हणजे, दररोज एक-एक अवशेष सापडत असल्याने तालुक्यात ते किती ठिकाणी पडले आहेत, याचा तपास आवश्यक झाला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र