शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आकाशातून पडले धातूचे दोन गोळे, चंद्रपूरचे खगोल अभ्यासक म्हणतात, सॅटेलाईटचे अवशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 07:42 IST

Chandrapur News: सिंदेवाही  तालुक्यापासून तीन किमी अंतरावरील लाडबोरी व १५ किमी अंतरावरील पवनपार येथील परिसरात शनिवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास आकाशातून धातूची रिंग व दोन मोठ्या गोलाकार वस्तू पडल्या.

- संदीप बांगडेचंद्रपूर - सिंदेवाही  तालुक्यापासून तीन किमी अंतरावरील लाडबोरी व १५ किमी अंतरावरील पवनपार येथील परिसरात शनिवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास आकाशातून धातूची रिंग व दोन मोठ्या गोलाकार वस्तू पडल्या. या गोलाकार वस्तू सिलिंडर असाव्यात, असे मानले जात आहे. एका सॅटेलाईटचे हे अवशेष असल्याची माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे व प्रा. योगेश दुधपचारे यांनी दिली.

शनिवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात आकाशातून काही लाल रंगाच्या वस्तू पृथ्वीकडे वेगाने येत असल्याचे नागरिकांना दिसले. अनेकांनी याचे चित्रीकरणही केले. दरम्यान, सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे संदेश तुकाराम माळवे यांच्या घराशेजारी एक भलीमोठी धातूची तप्त रिंग कोसळली. सुमारे आठ फुटांची ही रिंग आहे. 

रविवारी सकाळी पवनपार येथील विजय वाढई, महादेव वाढई हे मोहफूल गोळा करण्याकरिता जात असताना त्यांना धातूची गोलाकार सिलिंडरसदृश वस्तू जमिनीवर पडल्याचे दिसले. शनिवारच्या घटनेमुळे नागरिक आधीच सतर्क होते. या वस्तूला कुणीही हात लावला नाही. तालुक्यातीलच मरेगाव येथे असेच सिलिंडर मोकळ्या जागेत पडून असल्याचे दिसले. पोलिसांनी अवकाशातून पडलेल्या वस्तू सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जमा केल्या. हे दोन्ही सिलिंडर सारखेच असून, अंदाजे आठ किलो वजनाचे आहेत. 

निरीक्षणासाठी खगोल शास्त्रज्ञ आज येणारखगोलीय दृष्टिकोनातून ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या घटनेचा अभ्यास व पडलेल्या अवशेषाचे करण्याकरिता खगोल शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्यासह हे शास्त्रज्ञ सोमवारी सिंदेवाही ठाण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार गणेश जगदाळे यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र