नेहमीप्रमाणे सुखीराम सकाळी ८-४५ वाजता ते आपल्या कामावर जाण्यासाठी निघाले. दरम्यान, एमएच ३४- झेड ९४६१ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने त्याला धडक दिली. यामध्ये त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली. तर दुचाकीस्वारही या अपघातात जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी दोघांनाही बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
बल्लारपूर मार्गावरील अपघातात दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST