शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दगडाला दुचाकी धडकून अपघात, दोन मित्र ठार

By राजेश भोजेकर | Updated: April 14, 2023 18:27 IST

नागपूर -चंद्रपूर महामार्गावरील घटना

चंद्रपूर : वरोऱ्याहून भद्रावतीकडे रेसर बाईकने फिरण्यासाठी आलेल्या दोन मित्रांचा मानोरा फाट्याजवळ दगडाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात दोघेही ठार झाल्याची घटना शुक्रवारी एक वाजताच्या सुमारास घडली.हर्ष सुरेश पाचभाई (२२)  राहणार गणेश नगर वरोरा, अंकुश सुनील भडगरे (२३) राहणार सिद्धार्थ नगर वरोरा असे अपघातात ठार झालेल्या दोन युवकाचे नाव आहे.

अंकुश हा आपली बाईक घेवून त्याचा मित्र हर्षला वरोरा येथील जिम आटोपून भद्रावतीकडे रेसर बाईक क्रमांक ३४ सीसी ९६३९ ने फिरण्याकरिता येत असताना नागपूर -चंद्रपूर महामार्गावरील भद्रावती लगतच्या मानोरा वळण रस्त्यावर बाजूला असलेल्या दगडाला जोरदार धडक दिली. धडक एवढी मोठी होती की हे दोघेही हवेत उडून मानोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपटले. यात हर्ष पाचभाई हा जागेवरच मरण पावला तर अंकुश भडगरे याला उपचाराकरिता चंद्रपूर येथे नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. घटना घडताच भद्रावती पोलीस दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातchandrapur-acचंद्रपूर