शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2022 22:48 IST

संकेत झाडे (२४), अंकित मत्ते (दोघेही रा. सिदूर) अशी मृतकांची नावे आहेत. माथूरकर गंभीर जखमी असून, त्याला दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तोदेखील सिदूर येथील रहिवासी आहे. ही घटना घडताच चिंचाळा व सिदूर येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने पडोली-घुग्घुस रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस :  मित्राला सोडण्यासाठी दुचाकीने टिबल सीट  निघालेल्या दुचाकी वाहनाला कॅप्सूल ट्रॅकने मागून धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास घडली.संकेत झाडे (२४), अंकित मत्ते (दोघेही रा. सिदूर) अशी मृतकांची नावे आहेत. माथूरकर गंभीर जखमी असून, त्याला दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तोदेखील सिदूर येथील रहिवासी आहे. ही घटना घडताच चिंचाळा व सिदूर येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने पडोली-घुग्घुस रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माहितीनुसार, घुग्घुसकडून कॅप्सूल ट्रक (क्रमांक एमएच ३४-एबी ८६७७) हा पडोलीकडे जात होता, तर सिदूर येथून हे तिघेही त्यातील एका मित्राला वडगाव येथे सोडण्यासाठी  जात होते. दरम्यान, चिंचाळा वळणावर कॅप्सूल ट्रॅकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार संकेत झाडेचा जागीच मृत्यू झाला, तर अंकित मत्ते याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माथूरकर याच्यावर औषधोपचार सुरू आहे. घटनेची माहिती पडोली पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, संतप्त नागरिकांनी मृतकाच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत देण्याची मागणी करीत रास्तारोको केला.  यादरम्यान पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पडोलीचे ठाणेदार कोंडावार यांनी लगेच दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले.  अखरे ट्रान्सपोर्ट व मृतकाचे हितचिंतक यांच्यात झालेल्या संयुक्त चर्चेत मृतक परिवारास दोन लाख तर जखमीला औषोधोपचाराचा खर्च देण्याचे  मान्य केल्यानंतर आठ तास चाललेले रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

 

टॅग्स :Accidentअपघात