शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

By admin | Updated: February 24, 2016 00:52 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना विद्यापीठ टिचर्स असोसिएशनतर्फे ‘डॉ. आंबेडकर अ‍ॅज ए नॅशन बिल्डर’ या विषयावर ...

मान्यवरांचे मार्गदर्शन : ‘डॉ. आंबेडकर अ‍ॅज ए नेशन बिल्डर’ विषयावर परिषदचंद्रपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना विद्यापीठ टिचर्स असोसिएशनतर्फे ‘डॉ. आंबेडकर अ‍ॅज ए नॅशन बिल्डर’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचा समारोप शनिवारी केंद्रीय रासायने व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर पेटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.याप्रसंगी प्रामुख्याने गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, सहसचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिय सोसायटीचे कुणाल घोटेकर, जागरण शिक्षण संस्थाचे मतीन शेख, शरद पवार कला महाविद्यालयाचे प्राचार्य सिंग, शंकरराव बेझलवार महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद काटकर, परिषदेचे संघटक सचिव डॉ. प्रमोद शंभरकर, परिषदेचे समन्वयक डॉ. इसादास भडके आदी मंचावर उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे आम्ही लोकप्रतिनिधी झालोत या देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याकरिता बाबासाहेबांनी संविधान दिले. ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर त्यांच्या १२५ व्या जयंतीननिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद चंद्रपुरात होत आहे. त्याचा मला अभिमान वाटतो, असे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले. प्रमुख पाहुणे डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांनीही या उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढले.याप्रसंगी परिषदेनिमित्त ५०० शोधनिबंध असलेल्या सीडीचे प्रकाशन मान्वर पाहुण्याच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. तक्षशील सुटे यांनी केले. प्रास्ताविक संघटनेचे सचिव डॉ. प्रमोद शंभरकर यांनी केले. आभार समन्वयक डॉ. इसादास भडके यांनी केले. राष्ट्रगीताने आंतरराष्ट्रीय परिषदेची यशस्वी सांगता झाली. (प्रतिनिधी)भारतीय राज्यघटना विकासाचा जाहीरनामा : विकास जांभुळकरया आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेत डॉ. विकास जांभुळकर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. डी. निमसरकार हे होते. डॉ. विकास जांभुळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून दिलेली राज्यघटना भारतीयांच्या विकासाचा जाहीरनामा आहे. भारतीय राज्यघटना माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करुन देणारी आहे. भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविक बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या भारताचे भवितव्य आकाराला आणणारी असल्याचे विकास जांभूळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. वंचितांना शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची : समीर कदमभारतीय शिक्षणपद्धती पूर्वावार चालत आलेल्या अंधश्रद्धात्मक मुल्यांना खतपाणी देणारी आहे. विद्यापीठीय शिक्षणप्रणाली गरिबांना न परवडणारे असून भांडवलदारांना प्रोत्साहन देणारी आहे. भारताला महाशक्तीचे स्वप्न दाखविणारी असून महासत्तेला गालबोट लावणारी आहे, असे परखड मत पुसद येथील डॉ. समीर कदम यांनी मांडले. वर्तमान भारतीय विद्यापीठातील शिक्षण भारताला सूपर पॉवर बनविण्यास सक्षम आहे का? असा त्याचा व्याख्यानाचा विषय होता. ते पुढे म्हणाले, खाऊजा संस्कृतीमुळे शिक्षणाचा उफराटा झालेला असून सामान्य उच्च शिक्षणापासून दूर लोटल्या जात आहे. उच्च शिक्षणाचे सिलॅबस भारताला गुलाम करणारे जाणवते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणाबद्दलचा प्रगल्भ दृष्टिकोन मांडलेला आहे. दबलेल्या घटकांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार शिक्षणाच्या खासगीकरणाला प्रोत्साहन देत आहे. शिक्षणातील आरक्षणासंदर्भात लंपडाव सुरु आहे असा आरोप त्यांनी केला.