शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाघीण, बिबट्यासह दोन बछडे सापडले; वाघ मात्र मोकाटच

By परिमल डोहणे | Updated: May 28, 2023 23:28 IST

मागील काही दिवसांपासून सावली परिसरात वाघाने मोठा धुमाकूळ माजवला होता. अनेक वन्यप्राण्यांसह काही नागरिकांचाही बळी घेतला होता. परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती.

चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रात सात हजारांपेक्षा अधिक जागेवर वनव्याप्त असलेल्या व्याहाड (खुर्द) उपवन कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांत वाघ व बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. दरम्यान, वन विभागाने नरभक्षी वाघीण व बिबट्यासह दोन बछड्यांना जेरबंद केले. मात्र, वाघोली बुटी, सामदा परिसरात असलेला वाघ वन विभागाला हुलकावणी देत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

मागील काही दिवसांपासून सावली परिसरात वाघाने मोठा धुमाकूळ माजवला होता. अनेक वन्यप्राण्यांसह काही नागरिकांचाही बळी घेतला होता. परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. दरम्यान, २१ मे रोजी वैनगंगा नदीकाठावरील डॉ. रुढे यांच्या फार्महाउस परिसरात दडून असलेली मादी बिबट व दोन बछडे व २७ मे रोजी व्याहाड (खुर्द) येथील केरोडा मार्गावरील नर्सरीमध्ये वाघीण पकडण्यात वन विभागाला यश आले होते. याहूनही वाघोली बुटी, सामदा परिसरातील वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने २१ मे पासून वैनगंगा नदीकाठावरील शेत परिसरात अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावण्यात आले आहेत. 

व्याहाड जंगल परिसरात व नदीकाठावरील लावलेल्या कॅमेऱ्यात वाघ चित्रित झाला आहे. त्यामुळे या परिसरात वाघाचा संचार असल्याचे वन विभागाच्या लक्षात आले आहे. दोन, ते तीन दिवसांपासून २८ मे रोजी वाघोली सामदा परिसरातील दागोबा देवस्थानकडे वाघ फिरत असल्याचे सामदा येथील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात बघितले असल्याने भीती निर्माण झाली आहे. या वाघाचा लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

शेतावर जायचे कसे?सावली तालुक्यात जेरबंद झालेल्या वाघिणीने चार जणांचा बळी घेतला होता. त्यासह काही जनावरांचाही फडशा पाडला होता. खरीप हंगाम जवळ आल्याने हंगामपूर्व कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जात आहेत; परंतु या परिसरात वाघाचा संचार असल्याने शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

वाघोली बुट्टी सामदा परिसरात लोकांच्या माहितीनुसार वाघ फिरत असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने त्या परिसरात ६० पेक्षा अधिक कॅमेरे लावले आहेत. रोज कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. एवढेच नव्हे तर सहा लाइव्ह कॅमेरे लावले आहेत. त्याद्वारे मी स्वत: ऑफिसमधूनच त्या परिसरातील हालचाली बघू शकतो. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ३० वनकर्मचारी गस्तीवर आहेत. कॅमेऱ्यात वाघ कैद झाल्यानंतर पुढची योजना आखता येईल.-प्रवीण विरुटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली

टॅग्स :Tigerवाघ