शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

दोन कोटींचा भूखंड केला गिळंकृत

By admin | Updated: May 27, 2015 01:25 IST

राजुरा शहरातील शासकीय जमिन आणि मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमण शोधण्यासाठी एक उच्चस्तरीय कमिटीच गठित करण्याची आता गरज निर्माण झाली आहे.

बी. यू. बोर्डेवार राजुराराजुरा शहरातील शासकीय जमिन आणि मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमण शोधण्यासाठी एक उच्चस्तरीय कमिटीच गठित करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. येथे शासकीय जमिनीची परस्पर विल्हेवाट लावण्याचे गंभीर प्रकार घडत असतानाही त्याविरुद्ध कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राजुरा नगर परिषद हद्दीमधील चुनाभट्टी वॉर्डातील जवळपास दोन करोडच्या १६ हजार फूट जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून नगर पालिकेने दोन एकर जागेपैकी मोकळा भूखंड शिल्लक ठेवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करायला हवी होती. परंतु १४ हजार ४०० फूट आणि ६ हजार ३०० वर्ग फुटाचे दोन ले-आऊट नगर पालिकेच्या बगिचासाठी राखीव ठेवण्यात आली असताना आता या दोन्ही भूखंडांवर अवैध ताबा करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या भूखंडांवर अतिक्रमण केले जाते, त्यावर पक्की घरे तयार होतात. असे असताना त्याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोकळ्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या घरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याच ले-आऊट मध्ये प्लॉट क्रमांक एक हे लहानुबाई बल्की यांचे असून ६० बाय ४० म्हणजेच दोन हजार चारशे वर्गफूटाचे असताना नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी (पत्र क्रमांक ६५८ नुसार) ३ हजार २०० वर्गफूटाचे मालकी हक्क प्रमाणपत्र दिले. या महिलेने केलेल्या अर्जावर स्वाक्षरी आहे. दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करुन देताना मात्र अंगठा मारला आहे. त्यामुळे खोटा अर्ज करुन तिने मालकी हक्क मिळविला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तत्कालिन मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन प्रमाणपत्र दिले. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. शासकीय जागा, व नगरपालिकेचे मोकळे भूखंड गिळंगृत होताना मात्र येथील शासकीय अधिकारी राजकीय दबावात येऊन कारवाई करण्यासाठी कचरत आहेत. राजुरा शहरातील ले-आऊटधारकांना फायदा पोहचविण्यासाठी विकास आकार शुल्क घटवून शासनाच्या तिजोरीला चुना लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नगरसेवक दिनकर आकनुरवार यांनी केला आहे. २० आॅक्टोबर २०१२ ला झालेल्या सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक १५ नुसार २० रुपये फूट विकास शुल्क आकारण्याचे ठरले. यानंतर ४ फेब्रुवारी २०१३ ला सर्वसाधारण सभा घेऊन २० रुपये प्रती चौरस फूटावरुन आकार शुल्क घटवून १० रुपये प्रती चौरस फूट करण्यात आला. सर्वे क्रमांक १४९/१५ या ले-आऊटला २००३ मध्ये मान्यता मिळाली. परंतु तेव्हा विकसित न करता २०१३ मध्ये एकमुस्त रक्कम भरुन विक्री परवाना देण्यात आला. २००९ नंतरच्या ले-आऊटधारकांना विकसीत कर लावण्याचा ठराव घेण्यात आला. परंतु २००९ पूर्वीच्या ले-आऊटला विकसीत कर लावला नाही. त्यामुळे अर्धी रक्कम करण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून महसूल विभागाची फसवणूक करण्यात आली आहे.