शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! आईवडिलांच्या दरम्यान आलेल्या प्रेयसीचा दोन भावांनी काढला काटा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 22:10 IST

Chandrapur News आई आणि वडिलांच्या मधात ‘ती’ आल्याने घरातील वातावरण बिघडले. ही बाब असह्य झाल्याने दोन मुलांनी वडिलांची प्रेयसी असलेल्या ‘ती’चा धारदार शस्त्राने हत्या करून काटा काढला.

ठळक मुद्देपाच तासात लागला हत्येचा छडादोघा भावंडांना अटक

 

चंद्रपूर : आई आणि वडिलांच्या मधात ‘ती’ आल्याने घरातील वातावरण बिघडले. ही बाब असह्य झाल्याने दोन मुलांनी वडिलांची प्रेयसी असलेल्या ‘ती’चा धारदार शस्त्राने हत्या करून काटा काढला. ही थरारक घटना बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास रमाबाई नगर परिसरात झरपट नदीच्या काठावर घडली. मना मनोज कोठार (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर दोघेही भावंडे फरार झाली. मात्र अवघ्या पाच तासातच रामनगर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत दोघांनाही अटक केली. यात एक अल्पवयीन असून दुसऱ्याचे नाव अमरजित शशीकपूर चव्हाण (२०)असे आहे.

मना कोठार हिला तीन मुले आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून ती पती व मुलांपासून विभक्त राहते. तिचा पती बाहेर राज्यात आपल्या मुलांसोबत राहतो. अशातच तिची ओळख शशीकपूर चव्हाण यांच्याशी झाली. दोघांत प्रेम जुळले. यातून त्यांच्यात जवळीक वाढली. आपल्या आई-वडिलांच्या मधात परस्त्री आल्याची बाब चव्हाण यांच्या मुलांना खटकली. यावरून घरातील घरातील वातावरण बिघडले. तेव्हापासूनच या महिलेचा काटा काढण्याचा कट शशीकपूर चव्हाण यांचा मुलगा अमरजित व त्याचा अल्पवयीन चुलत भाऊ यांनी रचला. हे दोघेही मनावर पाळत ठेवत होते.

बुधवारी सकाळी मना ही झरपट नदीच्या काठावर प्रात:विधीसाठी गेली होती. अशातच मागावर असलेल्या चव्हाण बंधूंनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यानंतर हे दोघे भाऊ घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळाने परिसरातील नागरिकांना मनाचा मृतदेह दिसताच याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. दरम्यान, नव्यानेच नियुक्त झालेले रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपानी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

पोलीस तपासात चव्हाण नावाच्या व्यक्तीसोबत या महिलेचे प्रेमसंबंध असल्याची बाब पुढे येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. चव्हाण यांची मुले घरातून बेपत्ता असल्याचे लक्षात येताच संशय बळावला. अखेर गतीने शोध घेऊन अमरजित चव्हाण व त्याच्या अल्पवयीन चुलत भावाला ताब्यात घेतले. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपानी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी