लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शहरापासून दोन किलोमिटर अंतरावरील नेरी-चिमूर व मासळ-चिमूर मार्गाच्या टी पार्इंटवर दोन वेगवान दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत दोन युवक व एक युवती गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली. सुरज सृजन गेडाम (२५) रा. उरकुडपार, आकाश कवडू डफ (२५) रा. ठक्कर वॉर्ड, चिमूर व तेजस्वीनी रामदास कारमेंघे (२२) रा. काग अशी जखमींची नावे आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, सुरज सृजन गेडाम, तेजस्विनी कारमेंघे आकाश डफ व एक युवती असे चार जण अनुक्रमणे एमएच ३४२९८७ व एमएच ३४ ए ६८८१६ या दोन दुचाकीने भरधाव जात होते. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. सुरज गेडाम आकाश डफ, तेजस्वीनी रामदास कारमेंघे असे तिघे गंभीर जखमी तर एक युवती किरकोळ जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मडामे यांनी जखमीना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर पुढील उपचाराकरिता नागपूरला हलविण्यात आले. हे सर्वजण आकाश डफ याचा वाढदिवस साजरा करण्याकरिता जात होते, अशी शहरात चर्चा सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले करीत आहेत.
दोन दुचाकींच्या धडकेत तिघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:57 IST
शहरापासून दोन किलोमिटर अंतरावरील नेरी-चिमूर व मासळ-चिमूर मार्गाच्या टी पार्इंटवर दोन वेगवान दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत दोन युवक व एक युवती गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली. सुरज सृजन गेडाम (२५) रा. उरकुडपार, आकाश कवडू डफ (२५) रा. ठक्कर वॉर्ड, चिमूर व तेजस्वीनी रामदास कारमेंघे (२२) रा. काग अशी जखमींची नावे आहेत.
दोन दुचाकींच्या धडकेत तिघे गंभीर
ठळक मुद्देचिमूर-नेरी मार्गावरील घटना