शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

अडीच हजार जणांनी काढले घरबसल्या लायसन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

दलालांकडून अतिरिक्त पैसे आकारले जातात. अशी नेहमी वाहनचालकांकडून ओरड व्हायची. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. वाहन ४.० या प्रणालीअंतर्गत आधारकार्डच्या आधारे घरपोच लर्निंग लायसन्स देण्यास १४ जूनपासून सुरुवात केली. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात १० हजार ९४५ जणांनी लायसन्ससाठी अर्ज केले. जे अर्जदार ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झाले. संपूर्ण कागदपत्रे योग्य होती, अशा २ हजार ३३८ जणांना घरपोच लर्निंग लायसन्स देण्यात आले. 

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाहन परवान्यासाठी नागरिकांची दलालांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या फेसलेस सेवेंतर्गत मागील दोन महिन्यात जिल्ह्यातील २ हजार २३८ जणांनी घरबसल्या लर्निंग लायसन्स काढले आहे. विशेष म्हणजे हे लायसन्स मिळविण्यासाठी अर्जदारांना एकदाही आरटीओ कार्यालयात जावे लागले नाही. आता सहा महिन्याच्या आत त्यांना परमानंट लायसन्स काढता येणार आहे. वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. त्यातच दलालांकडून अतिरिक्त पैसे आकारले जातात. अशी नेहमी वाहनचालकांकडून ओरड व्हायची. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. वाहन ४.० या प्रणालीअंतर्गत आधारकार्डच्या आधारे घरपोच लर्निंग लायसन्स देण्यास १४ जूनपासून सुरुवात केली. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात १० हजार ९४५ जणांनी लायसन्ससाठी अर्ज केले. जे अर्जदार ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झाले. संपूर्ण कागदपत्रे योग्य होती, अशा २ हजार ३३८ जणांना घरपोच लर्निंग लायसन्स देण्यात आले. 

४६५ अर्ज कार्यालय स्तरावर प्रलंबित.

१४ जून ते ८ ऑगस्ट या कालावधी ऑनलाईन पद्धतीने लर्निंग लायसन्स काढण्यासाठी १० हजार ९४५ जणांनी अर्ज केले. त्यापैकी ४६५ अर्ज कार्यालय स्तरावर प्रलंबित असून त्याची प्रक्रीया सुरु आहे. पडताळणी झाल्यानंतर यांना मंजूरी देण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्वांनाही घरबसल्याच लर्निंग लायसन्स मिळणार          आहे.

१९४३ अर्जात त्रुटी

सरल ४.० ही प्रक्रीया सुरु झाल्यानंतर आतापर्यंत १० हजार ९४५ जणांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले आहेत. मात्र त्यापैकी दोन हजार २३८ जणांना लर्निंग लायसन्स मिळाले. परंतु, एक हजार ४३ जणांच्या अर्जात त्रुट्या आहेत. काहींनी संपूर्ण कागदपत्रे जोडले नाही. त्यामुळे त्यांना लर्निंग लायसन्स मिळू शकले नाही.

असा करा अर्जशिकाऊ लायसन्स मिळवण्यासाठी परिवहन डॉट जीओव्ही डॉट ईन या संकेतस्थळावर शिकाऊ परवान्याचा पर्याय निवडावा. त्यानंतर आधारकर्ड नंबर टाकावा, आलेला ‘ओटीपी’ टाकावा. त्यानंतर सर्व माहिती बिनचूक भरावी. त्यानंतर अर्ज सबमिट करायचा. त्यानंतर फोटो अ‍ॅन्ड सिग्नेचर’ अपलोड करुन शुल्क भरायचे. त्यानंतर ऑनलाइन चाचणी द्यावी लागेल. किमान ६० टक्के गुण मिळाल्यानंतर आपले शिकाऊ लायसन्स डाऊनलोड करून त्या ठिकाणी आपण त्याची छाायांकित प्रत काढू शकतो.

घरबसल्या लायसन्स काढण्याची फेसलेस प्रक्रीया अंत्यंत साधी आहे. १६ वर्षांवरील वाहनचालक या पद्धतीद्वारे लर्निंग लायसन्स काढू शकतात. आतापर्यंत सुमारे दोन हजार २३८ जणांना लर्निंग लायसन्स देण्यात आले आहे. अनेकजण या पद्धतीने लायसन्स काढीत आहेत. ज्या नेटकॅफेमध्ये परिक्षार्थ्यांच्या जागी दुसऱ्याला बसवून परीक्षा देण्यात येत असल्याचे उघडकीस येईल, अशा नेटकॅफेचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.- किरण मोरे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस