लसीचा तुटवडा : विसापूर, नांदगावात मोकाट कुत्र्यांचा हैदोसलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील नांदगाव (पोडे) व विसापूर येथे मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे फिरत आहेत. गाव पातळीवर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत आहे. विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत आजतागायत २५ जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. कुत्रा चावल्यानंतर रॅबीज रोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीची गरज असते. मात्र येथील आरोग्य केंद्रात लसीचा तुटवडा आहे. मोकाट कुत्र्यांची गावात दहशत पसरली आहे.विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत नांदगाव (पोडे) व शिवणी (चोर) या उपकेंद्रासह १० ते १२ गावांचा समावेश आहे. विसापूर गाव तालुक्यात सर्वात मोठे असून गावाची लोकसंख्या १५ हजारावर आहे. मागील दोन महिन्यांपासून गावात मोकाट कुत्र्याचा हैदोस वाढला आहे. येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा, म्हणून मागणी केली. परंतु अद्यापही ग्रामपंचायतीने उपाययोजना केली नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. नांदगाव(पोडे) गावासह वेकोलि वसाहतीत बेवारस कुत्र्यांनी थैमान मांडले. ग्रामपंचायतीने काही प्रमाणात मोकाट कुत्र्यांना हुसकावून लावले. मात्र वेकोलि मायर्नस क्वार्टर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांना हुसकावून लावले. विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १५० ते २०० रुग्ण तपासणी करुन औषधोपचार घेतात. परंतु रुग्णांच्या तुलनेत औषधी साठा उपलब्ध होत नसल्याची माहिती आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर कमीतकमी काही दिवसाच्या अंतराने तीनदा तर जास्तीत जास्त सात लसीची टोचणी करावी लागते. दोन महिन्यात २५ जणांना कुत्र्याने चावा घेतला. आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नाही. रुग्ण कल्याण समितीही गंभीर नाही. विसापूर, चुनाभट्टी, भिवकुंट, नांदगाव (पोडे) सह वेकोलि वसाहतीतील मोकाट कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.गावात मोकाट कुत्रे वाढले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने पाळीव कुत्र्याचे लसीकरण करण्याची मोहिम सुरु करावी. मोकाट कुत्र्यांना हुसकावून लावण्यासाठी उपाय योजना करावी. रॅबीजच्या लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नाही. रुग्णांना बल्लारपूर व चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवावे लागते. - डॉ. अनिल कुकडपवार, वैद्यकीय अधिकारी प्रा. आर. केंद्र विसापूर
विसापुरात कुत्र्यांचा २५ जणांना चावा
By admin | Updated: June 3, 2017 00:33 IST