लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रत्येक गावात पक्षाच्या शाखा स्थापन करावा. त्या शाखेद्वारे परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करावे, वेळप्रसंगी लोकहितासाठी आंदोलही करावे, असे आवाहन मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले.एप्रिल महिन्यात मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने संघटन बांधणीसाठी विदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या विधानसभेची आढावा शासकीय विश्रामगृहात नुकतीच पार पडली. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे नेते व माजी आमदार दीपक पायगुडे, मनसे उपाध्यक्ष विजय तळवळकर, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला जिल्हाध्यक्ष सुनिता गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर, चिमूर विधानसभा जिल्हाउपाध्यक्ष अरविंद सादेकर, ब्रम्हपुरी विधानसभा जिल्हाउपाध्यक्ष आनंद बावणे, चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे, आदी उपस्थित होते. यावेळी मनपाच्या स्थायी समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मनसेच्या नगरसेविका सीमा रामेडवार यांचा माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.माजी आमदार दीपक पायगुडे म्हणाले, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. तसेच पक्षसंघटनासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करावे, असे आवाहन केले.जिल्हा उपाध्यक्ष तळवळकर म्हणाले, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नवनवीन शाखांची स्थापना करुन कार्यकर्त्यांनी संवाद साधावा, असे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर कामाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात संघटना वाढीसाठी जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी राहुल खारकार, प्रकाश नागरकर, विवेक धोटे, बळी शेळकी, कुलदीप चंदनखेडे, शैलेश केळझरकर, भरत गुप्ता, मयूर मदनकर, सचिन कोतपल्लीवार, महेश वासलवार, महेश शास्त्रकार, किशोर मडगुलवार, प्रतिमा ठाकूर, मनोज तांबेकर, संजय भारदे, तुषार येरमे आदी उपस्थित होते.
जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:40 IST
प्रत्येक गावात पक्षाच्या शाखा स्थापन करावा. त्या शाखेद्वारे परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करावे, वेळप्रसंगी लोकहितासाठी आंदोलही करावे, असे आवाहन मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले.
जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा
ठळक मुद्देहेमंत गडकरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आढावा बैठक