शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

बाबूजींना रक्तदानाने आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:00 AM

गरजु रूग्णांना रक्त मिळावे, यासाठी त्यांनी रक्तदानाची शंभर केव्हाच गाठली होती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रक्तदान करून १०६ हा आकडा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, लोकमतच्या रक्तदान शिबिरात त्यांनी २४ वेळा रक्तदान केले आहे.

ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसाद : लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटरचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत जिल्हा कार्यालय व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत धनराज प्लाझा बिल्डींगमधील दुसऱ्या माळ्यावरील सभागृहात महारक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला.सकाळी ११ वाजता स्व. बाबूजींच्या प्रतिमेपुढे पुष्पांजली अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा तर प्रमुख पाहुणे म्हणून चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, आनंद नागरी बँकेचे संचालक जितेंद्र चोरडिया, लोकमतचे वितरक रमण बोथरा, लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर नागपूरचे डॉ. रवी भांगे, डॉ. रवी गजभिये आदी उपस्थित होते. सकाळी ११ वाजता उदघाटनानंतरच या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर रक्तदानानंतर रक्तदात्याला प्रमाणपत्र, डोनर कार्ड, सॅनिटायझर आणि मास्क भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन लोकमतचे सहायक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर यांनी केले. यावेळी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिलीप रिंगणे, गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौरभ ठोंबरे, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीचे विदर्भ संपर्क प्रमुख शेखर तावाडे, विठाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश काहीलकर, उपाध्यक्ष संजिवनी कुबेर, कमल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष नेत्रा इंगुलवार, जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य उपस्थित होते. नेत्रा इंगुलवार यांनी शिबिरात येणाºया सर्वांना मास्कचे वितरण केले.संजय वैद्य यांचे १०६ व्या वेळा रक्तदानराजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे माजी नगरसेवक संजय वैद्य यांनी रक्तदान चळवळीत अत्यंत निष्ठेने योगदान देऊन आरोग्य क्षेत्रातही बांधिलकी जोपासली आहे. गरजु रूग्णांना रक्त मिळावे, यासाठी त्यांनी रक्तदानाची शंभर केव्हाच गाठली होती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रक्तदान करून १०६ हा आकडा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, लोकमतच्या रक्तदान शिबिरात त्यांनी २४ वेळा रक्तदान केले आहे.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाBlood Bankरक्तपेढी