जिल्ह्यात ४० कोरोनाबाधिकांवर उपचार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:30 IST2021-08-26T04:30:24+5:302021-08-26T04:30:24+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यातील सध्या ४० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, पोंभूर्णा, बल्लारपूर, सावलीमध्ये प्रत्येक एक रुग्ण नव्याने आढळून ...

Treatment started on 40 corona patients in the district | जिल्ह्यात ४० कोरोनाबाधिकांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ४० कोरोनाबाधिकांवर उपचार सुरु

चंद्रपूर : जिल्ह्यातील सध्या ४० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, पोंभूर्णा, बल्लारपूर, सावलीमध्ये प्रत्येक एक रुग्ण नव्याने आढळून आला आहे तर मागील २४ तासात जिल्ह्यात तिघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या तीन रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील, चंद्रपूर तालुका, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६११ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ३२ झाली आहे. सध्या ४० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ६४ हजार ७८६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५ लाख ७४ हजार ४३७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५३९ बाधितांचे मृत्यू झाले आहे.

Web Title: Treatment started on 40 corona patients in the district