वरोऱ्यात ट्रॅव्हलबस व ट्रकची भीषण धडक; दोन्ही चालक जागीच ठार; प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 07:27 PM2022-01-14T19:27:36+5:302022-01-14T21:02:19+5:30

Chandrapur News भरधाव वेगाने जात असलेली ट्रॅव्हल बस डिव्हायडर ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर जाऊन समोरून येणाºया ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात ट्रक व ट्रॅव्हलचे दोन्ही चालक जागीच ठार झाले तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत.

Travel bus and truck crash in Warora; Both drivers were killed on the spot; Migrants injured | वरोऱ्यात ट्रॅव्हलबस व ट्रकची भीषण धडक; दोन्ही चालक जागीच ठार; प्रवासी जखमी

वरोऱ्यात ट्रॅव्हलबस व ट्रकची भीषण धडक; दोन्ही चालक जागीच ठार; प्रवासी जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देबस डिव्हायडर ओलांडून पलिकडे गेली


चंद्रपूर- नागपूरहून चंद्रपूरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने रस्त्याचे दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सचालक व ट्रकचालक या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ट्रॅव्हल्समधील १४ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. दोन गंभीर प्रवाशांना गॅस कटरच्या साहाय्याने ट्रॅव्हल्सचा काही भाग कापून बाहेर काढण्यात आले. ही घटना नागपूर - चंद्रपूर मार्गावरील वरोरा येथील रत्नमाला चौकाजवळ शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

शब्बीर खान (रा. जलनगर, चंद्रपूर) असे मृतक ट्रॅव्हल्सचालकाचे नाव आहे. वृत्त लिहिपर्यंत ट्रकचालकाचे नाव कळू शकले नाही.

योगीराज ट्रॅव्हल्स (क्रमांक एमएच ४० एटी ४८१) ही नागपूरहून ४० प्रवासी घेऊन चंद्रपूरकडे जात असताना वरोरा येथील रत्नमाला चौकाजवळ ट्रॅव्हल्सचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रॅव्हल्स रस्ता दुभाजकावरील विद्युत खांब तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ३४ बीएच ९५४० या क्रमांकाच्या ट्रकला धडकली. ट्रकचे केबीन तोडत ट्रॅव्हल्सचा काही भाग ट्रकमध्ये शिरला.

या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स व ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅव्हल्समधील जखमी प्रवाशांना बाहेर निघता येत नव्हते. घटनास्थळावर पोलीस व नागरिक पोहोचले. जेसीबीची मदत घेऊन ट्रॅव्हल्सला ट्रकपासून वेगळे केले. यात शब्बीर खान या ट्रॅव्हल्सचालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकाचाही मृत्यू झाला. जखमींमध्ये हर्षा झाडे (वनली), सुमित मानकर (वणी), प्रवीण घाटे (वरोरा), प्रणाली नंदकटे (टेमुर्डा), सुरज दाते, संतोष गारगटे (भद्रावती), रिना बागेसर, भोजराज बागेसर, अनिता परचाके (घुग्घूस), रुख्मा तुलस (कोरपना), सविता रांगडे, प्राची झगडे, सरस्वती डाहुले, आवेश अहमद (घुग्घूस) यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने वरोरा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

Web Title: Travel bus and truck crash in Warora; Both drivers were killed on the spot; Migrants injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात