शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

चंद्रपुरातील दारू दुकानांचे स्थानांतरण, मंजुरी वादग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:00 IST

चंद्रपुरातील जगन्नाथ बाबा नगरात परवानगी दिलेले देशी दारू दुकान हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक आंदोलन करीत आहेत. पोलिसांनी डोळेझाक करून दुकानदाराच्या बाजूने अहवाल सादर केला आणि जिल्हा प्रशासनाने स्थानांतरण व दुकान वाटपाला मंजुरी दिली, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मनपाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून दुकानाचे बांधकाम अधिकृत असल्याचा दाखला घेणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धार्मिक स्थळ, शैक्षणिक संस्था व रुग्णालयाजवळ निवासी वस्तीत देशी दारू दुकानाचे स्थालांतरण, बीअर शॉपी व वाईन शॉपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंजुरी दिल्याने संबंधित परिसरातील नागरिकांत रोष उफाळून येऊ लागला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंजूर केलेले सर्वच परवाने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.  चंद्रपुरातील जगन्नाथ बाबा नगरात परवानगी दिलेले देशी दारू दुकान हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक आंदोलन करीत आहेत. पोलिसांनी डोळेझाक करून दुकानदाराच्या बाजूने अहवाल सादर केला आणि जिल्हा प्रशासनाने स्थानांतरण व दुकान वाटपाला मंजुरी दिली, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मनपाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून दुकानाचे बांधकाम अधिकृत असल्याचा दाखला घेणे आवश्यक आहे. परंतु, सर्वच प्रकरणात असा दाखला घेण्याचे टाळण्यात आले, असेही परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात नागरिकांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्पादन शुल्क विभागावर टीका केली.

‘त्या’ अहवालातून दडविले सत्य  - दाताळा मार्गावरील देशी दारू दुकानाच्या उत्तरेकडून रस्ता असल्याचे अहवालात दाखविले; पण दुकानाच्या उत्तर व दक्षिणेकडे खासगी प्लॉट आहेत. हाकेच्या अंतरावरील जगन्नाथबाबा मठ, चर्च, बालाजी व हनुमान मंदिर असूनही अहवालात माहिती नाही. नागपूर रोडवरील महालक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये स्थानांतरित देशी दारू दुकानाला लागून बाल रुग्णालय, दत्त मंदिर, प्राथमिक शाळाही अहवालात नाही.

प्रवेशद्वार बंद करण्याचा सल्ला केडी कॉम्प्लेक्सच्या मंजूर नकाशात उत्तर-दक्षिण दोन्हीकडे प्रवेशद्वार आहेत. दक्षिणेकडील प्रवेशद्वारापासून डॉ. कोलते यांच्या दवाखान्यामागे नागदेवता मंदिर आहे. मंदिरामुळे अडचण निर्माण होऊ नये, यासाठी दक्षिणेकडील मंजूर नकाशातील प्रवेशद्वार बंद करण्याचा सल्ला उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारू दुकानदाराला दिल्याचा आरोप आहे.

सराफा बाजारातही वाईन शॉप  - सराफा बाजारात जैन मंदिराजवळ काळे यांचे फटाक्यांचे दुकान होते. या दुकानात आता बीअर शॉपी व वाईन शॉप सुरू होणार असल्याने जैन मंदिरात येणारे भाविक व सराफा व्यावसायिक संतापले आहेत. 

आज उत्पादन शुल्क कार्यालयासमोर निदर्शने

नियम डावलून वाटप केलेल्या दारू दुकानांविरोधात बुधवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.  मंगळवारी जगन्नाथ बाबा नगरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन देऊन तेथील देशी दारू दुकान हटविण्याची मागणी केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस व महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी धार्मिक स्थळ, शाळा व रुग्णालयाजवळ दारू दुकानांना परवानगी दिली. अशा अधिकऱ्यांची सरकारकडे तक्रार करून निलंबनाची मागणी करणार आहे.-पप्पू देशमुख, अध्यक्ष, जनविकास सेना, चंद्रपूर

 

टॅग्स :liquor banदारूबंदी