शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

चंद्रपूरमध्ये पुरामुळे वाहतूक बंद; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:34 IST

पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त : वर्धा नदीच्या बॅकवॉटरने शिवनी चोर परिसर जलमय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्धा नदीच्या पुरामुळे बामणी- राजुरा पुलावरील वाहतूक बुधवारी (दि. २०) बंद करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक सास्तीमार्गे वळविण्यात आली आहे. पुराच्या पाण्याने पूल बुडाले नाही. मात्र, सुरक्षा कठडे नसल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला. पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. वर्धा नदीच्या बॅकवॉटरने शिवनी चोर परिसरातही शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. पाण्याची पातळी कमी झाल्यावरच वाहतूक सुरू करावी. कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही याची यंत्रणेने काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज पुलाच्या प्रशासनाला दिल्या. 

पाहणीदरम्यान अतिवृष्टीने इसापूर व सातनाला धरणांचे दरवाजे उघडताच वर्धा व पैनगंगा नद्यांना मोठा पूर आला. या पुराने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. कोरपना, जिवती, राजुरा, चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील पिकांना मोठा तडाखा बसला आहे. वर्धा नदीचे बॅक वॉटर पिकांत शिरले. त्यामुळे कापूस, धान व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. कोठारी परिसरातील शेतात शिरल्याने कापूस, सोयाबीन व मिरची पिकांना मोठा फटका बसला. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत राजुरा तालुक्यातील विरूर, धानोरा, कविटपेठ, सिंधी, नलफडी, मूर्ती, विहीरगाव, सातरी, चणाखा, कोहपरा, पंचाळा, चुनाळा, बामनवाडा, चिंचोली, अंतरगाव, अन्नूर, अमृतगुडा, खांबाळा, सिर्शी आदी १९ गावांतील शेती पाण्याखाली आली होती. 

या परिसरात अद्याप पंचनामे करण्यात आलेले नाही. पंचनामा झाल्यानंतरच नुकसानीचे खरे चित्र पुढे येऊ शकते, अशी माहिती महसूल विभागाने दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, कोरपना व गोंडपिपरी तालुक्यात पिकांची मोठी नासधूस झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरग्रस्त भागाची पाहणीबल्लारपूरः जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बुधवारी (दि. २०) बामणी-राजुरा पुलाची तसेच शिवनी चोर (ता. चंद्रपूर) येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, बल्लारपूरचे नायब तहसीलदार साळवे, बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जोशी, पोलिस निरीक्षक विपीन इंगळे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, तलाठी दिनेश काकडे, शिवनी चोरचे सरपंच रवींद्र पहानपट्टे आदी उपस्थित होते.

अशा आहेत यंत्रणेला सूचना

  • वर्धा नदीच्या बँक वॉटरमुळे परिसरातील पिके मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आली. पूर ओसरल्यावर नुकसानग्रस्त शेतमालाचे पंचनामे अचूक पद्धतीने करावे.
  • उपविभागीय अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. पंचनामे करण्यात आलेल्या शेती व शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावावी. पंचनामे करताना संबंधित मालकाचे नाव व त्यांचा मोबाइल क्रमांक नोंदवावा, जेणेकरून नुकसान भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्यात.

गोंडपिपरी तालुक्यात ३९५ शेतकऱ्यांना फटकागोंडपिपरी तालुक्यात प्राथमिक अहवालानुसार, सर्वाधिक ३९५ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. यामध्ये कापूस, मिरची व सोयाबीन उत्पादकांचा समावेश आहे. त्याखालोखाल राजुरा तालुक्यातही ३७७ शेतकऱ्यांना पुराचा तडाखा बसला. पुरामुळे अनेकांचे पीक वाहून गेले. काहींच्या शेतात मलबा वाहून आल्याने उत्पादनाचे काही खरे नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

तालुकानिहाय नुकसान (हेक्टर)चंद्रपूर - ८३बल्लारपूर - ४३५वरोरा - ५७राजुरा - ३७७कोरपना - ३०. ८०गोंडपिपरी - ३९५

पिकनिहाय      नुकसान (हेक्टर)धान                      ८०कापूस                ११३९.७०सोयाबीन             १३५.५०तूर                      ८.००भाजीपाला              १५मका                     ०५

आठ धरणे १०० टक्के भरलीजिल्ह्यातील आठ धरणे १०० टक्के भरली आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. यामध्ये आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, पकडीगुडुम, डोंगरगाव आदी धरणांचा समावेश आहे. इरई धरणात २०.६१, तर अमलनाल्यात ९१.५४ टक्के जलसाठा झाला आहे.

पंचनामा करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देशपुराने मोठे नुकसान झाल्याने तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी प्रशासनाला दिले. पूरस्थितीचा त्यांनी व्हीसीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

 

टॅग्स :floodपूरchandrapur-acचंद्रपूर