शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
3
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
4
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
5
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
6
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
7
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
8
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
9
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
11
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
12
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
13
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
15
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
16
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
17
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
18
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
19
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
20
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 

पारंपरिक गोणपाट व्यवसाय डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:45 PM

शेतात मळणी करून धान्य घरी आणण्यासाठी वापरात येणारा ‘गोणपाट’ निर्मितीचा पोंंभूर्णा येथील व्यवसाय दुर्लक्षितपणामुळे संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देशासनाने लक्ष द्यावे : तुटपुंज्या गुंतवणुकीतूनही सुरू आहे ‘गोणपाट’ व्यवसाय

विराज मुरकुटे ।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : शेतात मळणी करून धान्य घरी आणण्यासाठी वापरात येणारा ‘गोणपाट’ निर्मितीचा पोंंभूर्णा येथील व्यवसाय दुर्लक्षितपणामुळे संकटात सापडला आहे.पेशव्यांच्या काळापासून नागपूर, सोलापूर, जालना, शहापूर ही ठिकाणे वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. या उद्योगांना स्वातंत्र्यपूर्व काळात राजाश्रय होता. परंतु ब्रिटिशांच्या काळात हे हस्त व्यवसाय बसले. ब्रिटिशांच्या आकर्षक वस्तू व कमी किंमत यामुळे स्थानिक कारागिरांच्या वस्तूला उठाव राहिला नाही. तरीही स्थानिक पातळीवर चालणाऱ्या दैनंदिन व्यवसायात उपयोगी पडणाºया वस्तूंची निर्मिती मात्र ग्रामीण भागात सुरूच होती. पोंभूर्णा येथे हातमाग मांगठा हा पारंपरिक व्यवसाय स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरूच आहे.१९३० ते १९४० च्या दशकात अनेक दलित कुटुंबांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून परंपरागत लुगडे विनण्याचा घरगुती व्यवसाय सुरू केला. त्यानंतर ‘नेवार’ विनणे सुरू झाले. पण काही कालावधीने तेही बंद झाले. त्यानंतर गोणपाट तयार करण्याचे व्यवसाय येथे सुरू झाले. पिकाची कापणी, शेतात मळणी करून रास घरी आणण्यासाठी गोणपाटाचा उपयोग केला जातो. बैलगाडीत मावेल एवढी जाड कापडाची एक मोठी पिशवीच असते. तिला गोणपाट म्हणतात. तिच्या साहाय्याने धान्य ढोलीत सुरक्षित ठेवले जाते. पण आता अनेक शेतकऱ्यांनी मळणीच्या प्रक्रिया बदलवल्याने गोणपाट वापराऐवजी पोत्यांचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. गोणपाट तयार करण्याच्या कामात दलित समाजाची तिसरी पिढी गुंतली आहे. चार महिन्यांची शेती केल्यानंतर उर्वरित काळात गोणपाट तयार करतात. दलित समाजाची ५० कुटुंबे या व्यवसायात गुंतली आहेत.अनुदान नाही, कर्जही नाहीअजूनही विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, आंध्रातील काही सीमावर्ती भागात या गोणपाटाची विक्री चालू आहे. उन्हाळाभर हे कार्य चालू असते. परंतु साहित्याच्या किंमतीत वाढ झाल्याने हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. विदर्भात पोंभूर्णा हे तालुक्याचे गाव ‘गोणपाट’ निर्मितीसाठी प्रसिद्द असले तरी शासनाकडून कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत या व्यवसायाला मिळत नसून बँकसुद्धा कर्ज देत नाही.