शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीतील सहिष्णूता व सौजन्यशिलता अजूनही कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

बसमध्ये एकत्र दोघेच बसतील, अशी बसण्याची व्यवस्था! पण गर्दीत दोनच्या जागी तिघेजण बसतात. एकमेकांना बसू देतात. बसायला लावतात. हे सारे होते ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून, सौजन्यातून आणि सहिष्णूतेतून. आता, त्यातही कुणी हेकड प्रवाशी, कशाला देऊ जागा म्हणत जराही सरकत नाही. पण ते अपवादानेच! एकंदरीत सारे प्रवाशी सौजन्याचे दर्शन घडवितात.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : बसमध्ये आताही केली जाते एकमेकांना मदत

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : सहिष्णुता हरपत चालली, अशी आपल्या देशात अधेमधे ओरड होत असते. मागील दोन वर्षात तर देशातील तथाकथित असहिष्णुतेच्या वाातावरणावर नाराज होऊन त्याचे खापर शासनावर फोडत देशातील नामवंत लेखक कवी, पत्रकार, लेखक, विचारवंत यांनी सरकारकडून त्यांना मिळालेले पुरस्कार परत करण्याचा सपाटाच लावला होता. देशात अजूनही असहिष्णूतेचे वातावरण असल्याचे बरेच जण म्हणतात. असेलही! पण एक सार्वजनिक क्षेत्र असे आहे जिथे सहिष्णुता, सहकाराची भावना व सौजन्यशीलता पदोपदी जाणवते. सामान्यांना अनुभवायला मिळते. त्यामुळे मन सुखावते. ते आहे लेकूरवाळी आणि लालपरी म्हणून बहुजन सुखाय बहुजन हिताय म्हणत गाव - शहर आणि खेड्यापर्यंत नेहमी धावत राहणारी एसटी बस.बसमध्ये एकत्र दोघेच बसतील, अशी बसण्याची व्यवस्था! पण गर्दीत दोनच्या जागी तिघेजण बसतात. एकमेकांना बसू देतात. बसायला लावतात. हे सारे होते ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून, सौजन्यातून आणि सहिष्णूतेतून. आता, त्यातही कुणी हेकड प्रवाशी, कशाला देऊ जागा म्हणत जराही सरकत नाही. पण ते अपवादानेच! एकंदरीत सारे प्रवाशी सौजन्याचे दर्शन घडवितात. एसटी बसमधून प्रवास करणारे हे मध्यमवर्गीय आणि गरीबच अधिक! गर्दीच्या वेळी त्यांच्यातील सौजन्यशीलता दोन सीटवर तिघे यातून प्रकर्षाने समोर येते. सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन असलेल्या रेल्वेच्या साधारण डब्यात ही सौजन्य - सहिष्णुतेचे असे दर्शन घडते. देशात असहिष्णुता अशी ओरड होत असताना एसटी बसच्या या अशा सहिष्णुतेचे वातावरण बघून समाधान लाभते, हे निश्चित. एसटी बसमध्ये खासदार व आमदार यांच्याकरिता राखीव जागा ठेवल्या असतात. सिटवर तसे लिहून असते. पण कोणताही आमदार वा खासदार बसने प्रवास करताना दिसत नाही. अपवाद म्हणून याबाबत काही नाव घेता येतील. माजी आमदार व खासदार स्व. राजे विश्वेश्वरराव महाराजांचा प्रवास नेहमीच बसने असायचा. बसमध्ये पत्रकार अपंग, महिला, अंध यांच्याकरिता राखीव जागा असतात. पण, आपल्या राखीव जागेवर भलतेच कुणी बसले आहे, तेव्हा त्यांना उठवावे का, असा विचारही आरक्षितांना सूचन नाही.

टॅग्स :state transportएसटी