शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

‘त्या’ रस्त्यावर दिवसाढवळ्या नेहमीच होते वाघाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 05:00 IST

म्हसली तेलीमेंढा परिसर जंगलव्याप्त आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात जंगलाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाहार्णी ढोरपापर्यंत या जंगलाचा व्याप असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्य या जंगल परिसराला जवळ आहे. हा अभयारण्यास प्रसिद्धीच्या झोतात आणणाऱ्या सुप्रसिद्ध ''जय'' या वाघाची नेहमीच पाहार्णी म्हसली जंगलात भ्रमंती असायची. म्हणूनच जय बेपत्ता झाला. तेव्हा याच जंगलात अनेकदा जयचे ''लोकेशन'' घेण्यात येत होते.

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील म्हसली पाहार्णी जंगल परिसरातील अनेक गावात वन्यप्राण्यांची चांगलीच धूम सुरू आहे. तालुक्यातील तेलीमेंढा - म्हसली मार्गावर तर वाघाचे दिवसा ढवळ्या वाघाचे दर्शन होत आहे. यास दुजोरा देणारा एक व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहार्णी म्हसली परिसरातील रस्त्याने प्रवास करताना मनात चांगलीच धाकधूक असते.म्हसली तेलीमेंढा परिसर जंगलव्याप्त आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात जंगलाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाहार्णी ढोरपापर्यंत या जंगलाचा व्याप असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्य या जंगल परिसराला जवळ आहे. हा अभयारण्यास प्रसिद्धीच्या झोतात आणणाऱ्या सुप्रसिद्ध ''जय'' या वाघाची नेहमीच पाहार्णी म्हसली जंगलात भ्रमंती असायची. म्हणूनच जय बेपत्ता झाला. तेव्हा याच जंगलात अनेकदा जयचे ''लोकेशन'' घेण्यात येत होते. एवढेच नाही तर जय या वाघाचा बछडा म्हणून ज्याला ओळखले जायचे त्या ''श्रीनिवासन''ची हत्या याच म्हसलीनजिकच्या विलमजवळ करण्यात आली होती.अशी पार्श्वभूमी असलेल्या म्हसली, तेलीमेंढा, पाहार्णी या जंगल परिसरात वाघ, बिबट व अन्य जंगली प्राण्यांचा अधिवास सध्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या वन्यप्राण्यांनी व्यक्तींवर थेट हल्ला केल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या नसल्या तरी या वन्य प्राण्यांनी व्यक्तींना जंगलात व शेतात दिवसाढवळ्या दर्शन दिल्याच्या आणि पशुधनास जखमी व ठार केल्याच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. वनविभागाने या घटना लक्षात घेता या परिसरात गस्त वाढविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

व्हिडिओ व्हायरलयाच पार्श्वभूमीवर म्हसली तेलीमेंढा जंगल परिसरातील रस्त्याने एक वाघ स्वछंद विहार करीत असल्याचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. अगदी सकाळी दुधाची वाहतूक करणारी गाडी या रस्त्याने मार्गक्रमण करीत असताना हा वाघ जंगलातील रस्त्याच्या कडेकडेने येत असून काही वेळाने तो थेट रस्त्यावरच येतो. समोर वाघ आणि मागे दूध वाहतूक करणारी गाडी असे चित्तथरारक दृश्य या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

म्हसली पाहार्णी जंगल परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या परिसरातील रस्त्याने प्रवास करणे एकट्यादुकट्या माणसाचे काम नाही. अनेकदा शेतात काम करताना वाघ व बिबट्याचे दर्शन होत असते. वनविभागाने गस्त वाढवून गावकऱ्यांना दिलासा द्यावा.- जगदीश पानसे, गावकरी, म्हसली.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग