शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिवणी जंगलात वाघाचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:21 IST

शिवणी वनपरिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये सध्या मोहफुल वेचणे, सरपण गोळा करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. लवकरच तेंदुपत्ता संकलनाचे कामसुद्धा प्रारंभ होणार आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. वन्यप्राणी जंगलातील पाणवठ्याजवळ राहण्याची शक्यता असते.

ठळक मुद्देसावध राहा : पाणवठे कोरडे, वन्य प्राण्यांची शिवाराकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कवासेरा : शिवणी वनपरिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये सध्या मोहफुल वेचणे, सरपण गोळा करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. लवकरच तेंदुपत्ता संकलनाचे कामसुद्धा प्रारंभ होणार आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. वन्यप्राणी जंगलातील पाणवठ्याजवळ राहण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.उन्हाळ्यात पाणवठ्याजवळ अस्वलांचा हमखास अधिवास राहतो. त्यामुळे जंगलात जाऊन मोहफुल, सरपन व तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हे वनपरिक्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असल्याने वाघ अन्य प्राण्यांचा सतत संचार सुरू असतो. मोहफुल, सरपण व तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी एकट्या व्यक्तीने जंगलात जाऊ नये. जंगलातील पाणवठे कोरडे होण्याच्या मार्गावर अस आहेत. वन्यप्राणी पाण्यासाठी गावाशेजारीला नाल्यांकडे भटकत आहेत. त्यामुळे शिवणी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया सर्व गावातील नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. मोहफुले व तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या नागरिकांना वन विभागाच्या वतीने सतत माहिती देण्याची मोहीम सुरू आहे.जागृती मोहीमग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन जंगलावर अवलंबून असते. जंगल राखण्यात त्यांचेही योगदान मोठे आहे. मात्र, बदलत्या काळानुसार नागरिकांची मानसिकता घडविण्यासाठी वन विभागाकडून जागृती केली जात आहे. या उपक्रमाला गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.उन्हाची काहिली वाढली आहे.यावर्षी पाऊस कमी पडल्याने नाले कोरडे पडले. जंगलातील पाणवठे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. शिवणी वन परिक्षेत्रात वनोउपज गोळा करण्याचे काम नागरीक करीत आहेत. याच काळात वन्यप्राणी जंगलातील पाणवठ्याजवळ दबा धरून बसण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.- एस.आर. लंगडे,वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय शिवणी