शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबातील झुंजीत वाघाच्या बछड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 10:46 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रातील जानाळा परिसरात कक्ष क्र. ३५५ मध्ये एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देमूल बफर क्षेत्रातील घटना गाईवरून झुंज झाल्याचा अंदाज

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रातील जानाळा परिसरात कक्ष क्र. ३५५ मध्ये एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. दोन वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उजेडात आली.मृत वाघाचे वजन ५०.२५० कि.ग्रॅ. असून त्यांचे अंदाजे वय १४ ते १५ महिने असल्याचे समजते. सायंकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चोणकर व डॉ. रवी खोब्रागडे यांनी मृत वाघाची उत्तरीय तपासणी केली. मंगळवारी या परिसरात वाघाने एका गाईवर हल्ला चढवून ठार केले होते. ही बाब गुराख्याला माहिती होती. आज दुपारी सदर गुराखी संबंधित वनपाल व वनरक्षकाला घेऊन घटनास्थळ दाखविण्यासाठी गेला होता.सदर घटनास्थळापासून सुमारे १५ ते २० फूटावर वाघाचा मृतदेह आढळून आला. बछड्याचा पंजा व शेपटी तुटून पडलेली होती. यावरून दोन वाघांमध्ये शिकार झालेल्या गाईवरून झुंज झाली व यामध्ये या बछड्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.झुंजीत वाघाच्या शरीराचे तुकडे४ जुलै २०१७ रोजी मूल बफर क्षेत्रातील डोणी परिसरात दोन बछड्यांचा झुंजीत मृत्यू झाला होता. या दोन्ही बछड्यांची आई त्यापूर्वीच मरण पावली आहे. त्या वाघिणीला तीन बछडे होते. एक बछडा जिवंत होता. तो आता १५ महिन्यांचा झाला होता. या बछड्याची पसिरातील दुसऱ्या वाघासोबतच गाईचे मांस खाण्यावरून झुंज झाली असावी. झुंज इतकी कडवी होती की यामध्ये मृत बछड्याचा पंजा व शेपटी तुटलेली असून शरीरातील आतडेही बाहेर निघालेले आहेत, असे वनविभागाच्या सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

चार महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे झुंज होऊन एकाच वाघिणीचे दोन बछडे मरण पावले होते. हा बछडा त्याच वयाचा असल्यामुळे हे तीन बछडे एकाच वाघिणीचे असल्याचा संशय आहे. यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.- मुकुल त्रिवेदी, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पTigerवाघ