शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसांपासून जखमी असलेल्या ढाण्या वाघाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:19 IST

दोन वाघाच्या झुंजीत जखमी झालेल्या ढाण्या वाघाचा अखेरीस मृत्यू झाला. मागील पाच दिवसांपासून त्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता.

ठळक मुद्देउपचारापूर्वीच गेला बळीपरवानगीच्या प्रतीक्षेत आला मृत्यू

राजकुमार चुनारकरचंद्रपूर : दोन वाघाच्या झुंजीत जखमी झालेल्या ढाण्या वाघाचा अखेरीस मृत्यू झाला. मागील पाच दिवसांपासून त्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता. चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली जंगलातील कक्ष क्रमांक ५ मध्ये एका तलावाच्या शेजारी त्याने नाईलाजाने ठाण मांडले होते. हा प्रकार वनविभाग डोळे उघडून बघतही होता. मात्र वाघावर तत्काळ उपचार करण्याची तसदी या विभागाने घेतली नाही. त्यामुळे उपचारापूर्वीच त्या वाघाला अन्न, पाण्याविना प्राण सोडावा लागला. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ आणि संतापही व्यक्त केला जात आहे.दोन वाघांच्या झुंजीत जखमी झालेला पट्टेदार वाघ पाच दिवसांपूर्वी चिमूर वनपरिक्षेत्रातील भात्सुली जंगलातील कक्ष क्रमांक ५ मध्ये आला. गाव तलावाजवळ त्याने आश्रय घेतला. हा जखमी वाघ बुधवारी गावकरी व वनरक्षक एस. एन. पाटील यांना दिसला. त्यांनी याची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली. वनविभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. हा वाघ जखमी असल्याने शिकार करू शकत नव्हता. अशक्तपणामुळे पाणी प्यायला तलावातही जाऊ शकत नव्हता. त्याला बेशुध्द करून उपचार करण्यासाठी पीसीसीएफची परवानगी आवश्यक असते. येथील वनाधिकाऱ्यांनी वाघावर उपचार करण्यासाठी पीसीसीएफ नागपूर यांना परवानगी मागितली. मात्र मागील पाच दिवसात पीसीसीएफकडून अशी कुठलीही परवानगी आली नाही.दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्यानंतर पाच दिवसानंतर रविवारी वाघाला बेशुध्द करण्यासाठी नऊ जणांचे पथक भान्सुली जंगलात दाखल झाले. हे पथक जखमी वाघाला सुन्न करून तेथेच प्राथमिक उपचार करणार होते. मात्र ट्रॅक्यूलायझेशनची परवानगी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पथक वाघाजवळ गेले. मात्र वाघाचा मृत्यू झाला होता. खडसंगी येथील विश्रामगृह परिसरात उपवनसंरक्षक गजेद्र हिरे, सहायक उपवनसंरक्षक आर. एम. वाकडे, दक्षता उपवनसंरक्षक ब्राम्हणे, आर.एफ.ओ. भाविक चिवंडे, डॉ. हिमांशु जोशी, डॉ. रवी खोब्रागडे, उदय पटेल, मानद सचिव बंडु धोत्रे, वन्यजीव प्रतिनिधी अमोद गौरकर यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वाघावर अग्निसंस्कारही करण्यात आले.मृत्यूला जबाबदार कोण ?पाच दिवसांपासून जखमी वाघ भान्सुली जंगलात वेदनेने विव्हळत होता. वनाधिकाऱ्यांनी त्या वाघाचे छायाचित्रही काढले. त्यात त्याच्या पायावर व डोक्यावर जखमाही दिसून आल्या. वनजीव कायद्यानुसार एखादा वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळला तर त्याच्यावर ४८ तासात उपचार होणे आवश्यक आहे. मात्र येथे संपूर्ण वनविभाग जखमी वाघाच्या वेदना न्याहाळत बसला. वाघावर तत्काळ उपचार झाला असता तर तो निश्चित वाचला असता, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. मात्र असे झाले नाही. अखेर उपचाराविनाच वाघाचा मृत्यू झाला. या घटनेला वनविभाग आणि वनाधिकाºयांचा हलगर्जीपणाच जबाबदार असेल तर दोषींवर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे.परवानगी मागायला की द्यायला विलंब ?जखमी वाघावर उपचार करायचा असेल तर त्याला बेशुध्द करण्यासाठी नागपूर येथील पीसीसीएफकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र भान्सुली येथील प्रकरणात ही परवानगी प्राप्त व्हायला तब्बल पाच दिवस लागले. त्यामुळे जिल्ह्यातील वनाधिकाऱ्यांनी पीसीसीएफला परवानगी मागण्यासाठी विलंब केला की सर्व ठाऊक असतानाही पीसीसीएफने परवानगी द्यायला उशिर केला, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Tigerवाघ