वाघाचा बछडा पडला विहिरीत; वेळीच लक्षात आल्याने सुखरूप बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 12:47 PM2021-04-21T12:47:02+5:302021-04-21T12:47:23+5:30

Chandrapur news ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील एका विहिरीत बुधवारी सकाळी वाघाचा बछडा पडला. ही बाब वेळीच निदर्शनास आल्याने वनविभागाने त्याला सुखरूप बाहेर काढले. 

The tiger calf fell into the well; Safely out of time | वाघाचा बछडा पडला विहिरीत; वेळीच लक्षात आल्याने सुखरूप बाहेर

वाघाचा बछडा पडला विहिरीत; वेळीच लक्षात आल्याने सुखरूप बाहेर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील एका विहिरीत बुधवारी सकाळी वाघाचा बछडा पडला. ही बाब वेळीच निदर्शनास आल्याने वनविभागाने त्याला सुखरूप बाहेर काढले. 

चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर उपक्षेत्रातील दाबगावजवळील शेतामधील पाण्याने भरलेल्या विहरीमध्ये अंदाजे सहा-सात महिन्यांचा वाघाचा नर बछडा(छावां) पडल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली.  त्या माहिती आधारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी सहा जलद बचाव पथक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर हे सुध्दा  घटना स्थळावर पोहचून पाहणी केली. वरीष्ठ वन अधिकारी व डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी(वन्यजीव) TATR यांच्या मार्गदर्शनाखाली अजय मराठे, जलद बचाव गठ, यांनी  कॅच पोल (Catch pole) च्या सहायाने वाघिणीचे पिल्लू सुखरूप विहिरीबाहेर काढून पिंजऱ्यात टाकले. डॉ. पोचलवार हे उपस्थित होते. सदर वाघिणीच्या पिल्लाला पुढील उपचार करिता चंद्रपुरातील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे नेण्यात आले.

Web Title: The tiger calf fell into the well; Safely out of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ