वाघाचा पती-पत्नीवर हल्ला; पत्नी ठार, तर पती बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 05:43 PM2022-05-24T17:43:34+5:302022-05-24T17:45:10+5:30

Chandrapur News जंगलात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या दाम्पत्यावर अचानक वाघाने हल्ला चढविला. दरम्यान, झालेल्या झटापटीत वाघाने पत्नीला जागीच ठार केले. तर तिचा पती बेपत्ता झाला.

Tiger attack on husband and wife; Wife killed, husband missing | वाघाचा पती-पत्नीवर हल्ला; पत्नी ठार, तर पती बेपत्ता

वाघाचा पती-पत्नीवर हल्ला; पत्नी ठार, तर पती बेपत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देतेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते जंगलात चिमूर तालुक्यातील गोंदेडा बिटातील थरार

चंद्रपूर: जंगलात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या दाम्पत्यावर अचानक वाघाने हल्ला चढविला. दरम्यान, झालेल्या झटापटीत वाघाने पत्नीला जागीच ठार केले. तर तिचा पती बेपत्ता झाला. ही थरारक घटना तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गोंदेडा बिटातील कक्ष क्रमांक ३४ मध्ये मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. मीना विकास जांभुळकर (४०) ही वाघाच्या हल्ल्यात ठार झाली, तर तिचे पती विकास जांभुळकर (४६) हे बेपत्ता आहेत. वाघाने विकासला जंगलात फरफटत नेले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. गावकरी व वनविभागाने सुमारे ३ कि.मी. परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र काहीही गवसले नाही.

चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या केवाडा (पेठ) येथील जांभुळकर दाम्पत्य मंगळवारी सकाळी गावातील काही मजुरांसोबत तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेले होते. इतर मजूर दुसरीकडे होते. अशातच अचानक मजुरांना किंचाळण्याचा आवाज आला. मीना आणि विकास वाघाशी झुंज देत होते. ही बाब लक्षात येताच त्यांचीही अवस्था बिकट झाली. त्यांनी आरडाओरड करून इतरांना कळविले. गावात माहिती पोहोचताच जांभुळकर दाम्पत्याचा मुलगा प्रफुल जांभुळकर व गावातील नागरिकांनी जंगलाकडे धाव घेतली.

घटनास्थळाच्या परिसरातच मीना जांभुळकर यांचा मृतदेह आढळून आला. त्याच परिसरात विकासचाही शोध घेतला. तब्बल पाच तासांनंतरही विकासचा शोध लागला नाही. घटनास्थळापासून जवळपास तीन-चार किलोमीटर अंतरावर शोध घेतला. तरीही विकासचा काहीच पत्ता लागला नाही. विकास जिवंत आहे की वाघाने ठार केले हे मात्र अद्याप कळले नाही.

Web Title: Tiger attack on husband and wife; Wife killed, husband missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ