प्रशासनाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांचे स्वप्न भंगलेलोकमत न्यूज नेटवर्कचिखली : मुल तालुक्यातील चिखली येथे सन २०१३-१४ मध्ये जि.प.अंतर्गत भसबोरन तलावाजवळून जाणाऱ्या नाल्यावर लाखो रूपये खर्च करून सिमेंट प्लग बंधारा बांधण्यात आला. मात्र, तीन वर्ष लोटूनही या बंधाऱ्यावर पाणी अडविण्यासाठी लोखंडी पल्ला लावण्यात आल्या नाही. त्यामुळे बंधारा अपूर्णच राहिला मात्र कंत्राटदाराचे देयक देण्यात आले. त्यामुळे शासनाचा निधी व्यर्थ गेल्याची चर्चा सुरु आहे.एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या लाभासाठी योग्य सिंचनाची सोय व्हावी, म्हणुन लाखो रूपये खर्च करुन विविध योजना राबवित आहे. मात्र प्रशासनातील काही अधिकाऱ्याच्या वेळ काढू धोरणामुळे अनेक कामे पुर्णत्वास येत नाही. मात्र कंत्राटदारांचे देयके अदा केली जातात. त्यामुळ शासनाच्या योजना या शेतकऱ्याच्या हितासाठी असतात, की कंत्राटदाराच्या हिताच्या असतात. असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात भसबोरन तलावाजवळून जाणाऱ्या नाल्यावर लाखो रूपये खर्च करून सिमेंट प्लग बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे त्या बंधाऱ्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार होते. परिणामी शेतकरी खूशीत होते. मात्र बांधकामाला तीन वर्ष लोटूनही या बंधाऱ्यावर पाणी अडविण्यासाठी लोखंडी पल्ला लावण्यात आल्या नाही. त्यामुळे येथे पाणी अडत नाही. ते निघून जाते. त्यामुळे या पाण्यासचा वापर या परिसरातील शेतकरी करु शकत नाही. तरीसुद्धा कंत्राटदाराला त्याचे देयक देण्यात आले. मात्र आजही बंधारा अपूर्णच आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तीन वर्षांपासून बंधारा अपूर्णच, निधीची उचल
By admin | Updated: June 4, 2017 00:31 IST