शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

नगराध्यक्षपदासाठी तीन अक्षरी नावांवर बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:42 IST

निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कोणाचा ना कोणाचा वरचष्मा असतो. परंतु भद्रावती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यंदा तीन अक्षरी नावांचा नगराध्यक्षपदासाठी वरचष्मा असल्याचे पुढे येत आहे. नगराध्यक्षपदासाठी उभे असणाऱ्या आठ उमेदवारांपैकी प्रत्येक उमेदवाराचे नाव तीन अक्षरी आहे. यातील दोन उमेदवार अपक्ष आहेत.

ठळक मुद्देनगर परिषद निवडणूक : विजयासाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कोणाचा ना कोणाचा वरचष्मा असतो. परंतु भद्रावती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यंदा तीन अक्षरी नावांचा नगराध्यक्षपदासाठी वरचष्मा असल्याचे पुढे येत आहे. नगराध्यक्षपदासाठी उभे असणाऱ्या आठ उमेदवारांपैकी प्रत्येक उमेदवाराचे नाव तीन अक्षरी आहे. यातील दोन उमेदवार अपक्ष आहेत.नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढणाऱ्या तीन अक्षरी नावांमध्ये अनिल सुनील, विशाल, कुशल, लक्ष्मण, भूपेंद्र, संजय, प्रशांत या नावांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे अनिल धानोरकर, भाजपातर्फे सुनील नामोजवार, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लक्ष्मण बोढाले, बीआरएसपीकडून अ‍ॅड. भूपेंद्र रायपुरे, बहुजन समाज पार्टीतर्फे विशाल बोरकर, भारिप बहुजन महासंघाकडून कुशल मेश्राम आणि अपक्ष म्हणून प्रशांत कारेकर व संजय आसेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे यातील विविध राजकीय पक्षांचे उमेदवार हेच आपआपल्या पक्षातील दिग्गज नेते मानले जातात. अपक्ष उमेदवारांचेही सामाजिक कार्यात योगदान आहे. सर्वच उमेदवार विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. चिन्ह वाटप झाल्याने निवडणूक प्रचाराला सगळेच उमेदवार सज्ज झाले. रिक्षा, आॅटो व चारचाकी वाहनांवर लाऊडस्पीकर बांधून शहरातील प्रत्येक वॉर्ड पिंजून काढत आहेत. त्यामुळे अनेकांना हंगामी रोजगार मिळाला. शहरातील मंगल कार्यालय, डेकोरेशन व कॅटरर्स व्यवसायातील आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवारही यंदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.कार्यकर्त्यांसाठी जेवणावळींवर जोरआयुधनिर्माणी (भद्रावती) : पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर अनेकांना आता नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे डोहाळे लागले. यावेळी आपणच सत्ता काबीज केली पाहिजे, या भावनेतून काही कार्यकर्ते व मतदार जेवणावळींचे आयोजन करण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक स्वयंघोषित नगरसेवक उमेदवारीच्या कामी लागले होते. आपल्यालाच यावेळी उमेदवारी जाहीर व्हावी यासाठी पक्षनेतृत्वाकडे अनेकांनी फिल्डिंगही लावली होती.