फोटोजिवती : तालुक्यातील टेकामांडवा येथे तीन घरांना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. टेकामांडवा येथील परशुराम व्यंकटी सोलंकर, सुरेश व्यंकटी सोलंकर आणि शिवशंकर पिराजी तरडे हे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. बघता बघता आग पसरून परशुराम व्यंकटी सोलंकर, सुरेश व्यंकटी सोलंकर आणि शिवशंकर पिराजी तरडे या तिघांचीही घरे जळाली. घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले व आग विझविली. अन्यथा संपूर्ण गावातच आग लागली असती. सदर घटनेचा पंचनामा टेकामांडवा येथील तलाठी सतीश मिटकर यांनी केले. या घटनेत सुरेश सोलंकर यांचे सव्वा तीन लाख, परशुराम सोलंकर यांचे तीन लाख आणि शिवशंकर तरडे यांचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. यांच्या घरातील वस्तू, धान्य, दागिने, रोख रक्कम, घरातील कागदपत्र आणि जनावरे जळून खाक झाले.
टेकामांडवा येथे तीन घरांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST