शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

तीन दिवस विजय साजरा; चौथ्या दिवशी पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधीतील प्रकार नीलेश झाडे गोंडपिपरी : ग्रामपंचायत निवडणुकीत आपला विजय झाला असे समजून त्याने तीन ...

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधीतील प्रकार

नीलेश झाडे

गोंडपिपरी : ग्रामपंचायत निवडणुकीत आपला विजय झाला असे समजून त्याने तीन दिवस विजयोत्सव साजरा केला. मात्र चौथ्या दिवशी त्याला कळले की आपण तर हरलो आहोत. दुसरीकडे आपण हरलो, असे वाटून दु:खात असणाऱ्या उमेदवाराला विजयाची बातमी कळताच त्याने जल्लोष सुरू केला. ही गमतीदार घटना गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे घडली. हा संपूर्ण तालुक्यासाठी चर्चेचा विषय ठरला.

ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. मात्र अद्यापही गावागावातील चौकाचौकात निवडणुकीच्या रंगतदार चर्चा सुरू आहेत. अशात भंगाराम तळोधी येथून आलेल्या बातमीने सुरू असलेल्या चर्चेला चांगलीच फोडणी दिली आहे. सलग तीन दिवस विजयोत्सव साजरा करणाऱ्या उमेदवाराला गुरुवारी कळले की आपण हरलो आहोत. बिचाऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले.

झाले असे, गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या भंगाराम तळोधी येथील कमलेश गेडाम हे शेतकरी ग्रामीण विकास आघाडीच्या पॅनलकडून उभे होते. त्यांचे निवडणूक चिन्ह करवत होते. या पॅनलमधील नऊ उमेदवार विजयी झाले असे समजून पॅनलवाल्यानी जल्लोष केला. कमलेश गेडाम यांचे प्रतिस्पर्धी मनोज सिडाम यांनी गेडाम यांचा विजयोत्सव बघून आपला पराभव झाला, असे गृहीत धरून उदास होते. अशातच गुरुवारी गावातील काही तरुण तहसील कार्यालयात गेले. तेव्हा त्यांना माहीत झाले की मनोज सिडाम यांचा विजय झाला आहे. कमलेश गेडाम यांना २१८ मते मिळाली तर मनोज सिडाम याला २३६ मते मिळाली. १८ मतांनी मनोज सिडाम यांचा विजय झाला. विजयाची माहिती मिळताच मनोज सिडाम यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.