शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'ती' दहा गावे अजूनही सिंचनापासून वंचितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 12:02 IST

Chandrapur : पकडीगुड्डूम प्रकल्पात भरपूर पाणी असूनही शेतकऱ्यांना लाभ नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : महाराष्ट्र सिंचन सुधार प्रकल्पांतर्गत नाबार्ड साहाय्यातून राज्यातील ६० प्रकल्पांमध्ये पकडीगड्डूम मध्यम सिंचन प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ८८ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, प्रकल्पातील १७ ते १८ गावांपैकी दहा गावे तीन दशकांपासून सिंचन सुविधांपासून वंचित आहेत.

पकडीगड्डूम जलाशय ते इंजापूरपर्यंत मुख्य कालवा आहे. डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपून वाया जात आहे. या प्रकल्पांतर्गत ३२०० हेक्टर सिंचन क्षमता प्रस्तावित असली तरी प्रत्यक्षात गेल्या ३० वर्षांत फक्त १००० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरच सिंचन करता आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचलेलेच नाही. 

गेल्या ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या कालव्यांमधील अनेक लघु कालवे आणि नाल्याजवळील शेतकऱ्यांनी शेतात लागवड केल्यामुळे ते नासधूस झाले आहेत. डोंगरी आणि चढ-उतार असलेल्या भागांमध्ये पाणी पोहोचविणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. अंबुजा सिमेंट प्रकल्पाला पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, कंपनीच्या खदानीमध्ये पर्यायी पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे कंपनीला पाणी न देता शेतकऱ्यांच्या बांधावर पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचविण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. 

मार्च २०२४ मध्ये सिंचन क्षमतेसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा सदुपयोग करून शेतकऱ्यांना बांधावर पाणी पोहोचवण्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठित करून प्रकल्प आराखडा तयार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी केली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पfarmingशेती