शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

तहानलेल्या चंद्रपूरकरांना योजनेचे ‘अमृत’

By admin | Updated: June 1, 2017 01:19 IST

मागील पाच ते सहा वर्षांपासून चंद्रपूरकर पाण्यासाठी बोंबा मारत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात आणि इतर

२३२ कोटींची योजना : प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मागील पाच ते सहा वर्षांपासून चंद्रपूरकर पाण्यासाठी बोंबा मारत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात आणि इतर ऋतूमध्येही नागरिकांना अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागते. यात मात करण्यासाठी आता मनपा अमृत योजना राबवित आहे. तहानलेल्या चंद्रपूकरांना केंद्र शासनाच्या या योजनेचे अमृत पाजण्यासाठी मनपाने कंबर कसली असून अतिशय जलदगतीने ही योजना पूर्णत्वास नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राट कंपनी मोकळी होते. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील एक-दोन वॉर्ड सोडले तर जवळजवळ सर्वच वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. पाण्याची टॉकी ते फिल्टर प्लॅन्टमध्ये असणारी पाईप लाईन मोठी असते. त्यानंतर मुख्य पाईप लाईनद्वारे हे पाणी संबंधित प्रभागात पोहचते. त्यानंतर ३ ते ४ इंचांच्या पाईपमधून हे पाणी वितरित केले जाते. पूर्वी ५० कनेक्शनधारकांना ज्या पाईनलाईनवरून पाणी वितरित केले जाते, त्याच पाईनलाईनवर आता १०० ते २०० कनेक्शन आहेत. त्यामुळे पाहिजे तसा पाणी पुरवठा होत नाही. चंद्रपूरच्या पाणी पुरवठ्यावरून महापालिकेच्या अनेक आमसभा गाजल्या. यावर अनेकदा सखोल विचारमंथन करण्यात आले. मात्र नागरिकांचा तहानलेला घसा तृत्प करेल, असा तोडगा मनपाला मिळाला नाही. त्यामुळे आता वितरण व्यवस्थेतील समूळ यंत्रणाच हळूहळू बदलविण्याची तयारी मनपाने केली आहे. यासाठी केंद्र शासनाची अमृत योजना अतिशय जलदगतीने राबविण्यात येणार आहे. २३१.७७ कोटींची ही योजना असून यात केंद्र शासन ५० टक्के, राज्य शासन २५ टक्के व मनपाकडून २५ टक्के असा खर्च करणार आहे. प्रारंभी जुन्या मशीनरीज बदलणार चंद्रपुरातील पाणी वितरण व्यवस्थेतील मोटारपंप व इतर मशनरीज जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या मशनरीज पाहिजे तशा काम करीत नसल्याचे संबंधित तंत्रज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कारणामुळेच चंद्रपूरचा पाणी पुरवठा प्रभावित होत आहे. त्यामुळे अमृत योजनेतून सर्वप्रथम नव्या मशनरीज खरेदी करून त्याचा तत्काळ वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून नागरिकांना योजना पूर्ण होण्यापूर्वीच मुबलक पाणी मिळू शकेल. अमृत योजनेंतर्गत मशनरीज खरेदीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मशनरीज खरेदीचा प्रस्ताव आधीच शासनाकडे पाठविला आहे. आता आमसभेने अमृत योजनेच्या संपूर्ण प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रस्तावही केंद्राकडे पाठविला आहे. तेथून मंजुरी मिळताच अत्यंत जलदगतीने ही योजना पूर्णत्वास आणली जाईल. -विजय देवळीकर, उपायुक्त, मनपा चंद्रपूर. धरण व नदीतून घेणार पाणी अमृत योजनेसाठी प्रारंभी माना टेकडी परिसरातून पाणी घेण्याबाबत विचार करण्यात आला होता. मात्र यासाठी फार मोठी पाईपलाईन टाकावी लागणार आहे. त्यामुळे योजनेच्या पहिल्या टप्प्यात इरई धरण व दाताळा मार्गावरील इरई नदीच्या पात्रातून पाणी घेण्यात येणार आहे. समूळ यंत्रणाच बदलणार अमृत योजनेंतर्गत प्रारंभी मोटारपंप व इतर मशनरीज खरेदी केल्या जाणार आहे. त्यानंतर पाण्याचा टाक्या उभारण्यात येणार आहे. यासोबत शहरातील जुनी खिळखिळी झालेली संपूर्ण पाईपलाईनही नव्याने टाकण्यात येणार आहे.