लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा तिसºया दिवशीही शोध लागला नाही. त्याच्या कथित अपहरणामागे नरबळीचे कारण नसावे, असे ब्रह्मपुरीत तर्कवितर्क काढणे सुरू झाले आहेत.बुधवारी बकरी ईदनिमित्त सुट्टी असल्याने युग हा अपाल्या मोठ्या चार वर्षीय हर्षल नावाच्या भावासोबत खेळत होता. दोघेही रेतीवर खेळत असताना युग अचानक बेपत्ता झाला. परंतु नर्सरीमध्ये मोठा भाऊ हर्षल शिकतो. खेळत असताना कोणीतरी आले व युगला चॉकलेज दिल्याचे तो दबक्या स्वरूपात सांगत आहे. त्या दिशेने ब्रह्मपुरी पोलिसांचा तपास सुरु आहे. परंतु युगचे वडील यांच्याशी मोबालवरुन संपर्क साधला असता आमचा कुणाशी वैर नाही व कुणावरही संशय नाही, असे ते म्हणाले. युगच्या बेपत्ता होण्यामागे नरबळीचे प्रकरण नाही ना, असा संशयही व्यक्त केला जात आहे. चंद्रपूरवरुन एलसीबी पथक श्वान पथक दाखल झाले होते. अजूनही कुठलाही सुगावा लागला नाही. युगचा शोध पोलिसांपुढे आव्हान आहे.
तिसऱ्या दिवशीही युग बेपत्ताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:17 IST
खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा तिसºया दिवशीही शोध लागला नाही. त्याच्या कथित अपहरणामागे नरबळीचे कारण नसावे, असे ब्रह्मपुरीत तर्कवितर्क काढणे सुरू झाले आहेत.
तिसऱ्या दिवशीही युग बेपत्ताच
ठळक मुद्देपोलीस तपासाला वेग: नरबळीसाठी अपहरणाचा संशय