शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी क्षेत्र सहाय्यक कार्यालय फोडले; जेवण केले अन् नंतर पळवला वाघाचा पंजा 

By परिमल डोहणे | Updated: September 16, 2022 18:44 IST

सावली वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक कार्यालय व्याहाड खुर्द येथील घटना

चंद्रपूर : कुलूपबंद असलेले क्षेत्र सहायक कार्यालय फोडून चोरट्यांनी चक्क स्वयंपाक केला. जेवणावर यथेच्छ ताव मारल्यानंतर कार्यालयातील टिनाची पेटी फोडून तेथील वाघाच्या नखांसह असलेला पंजा पळविल्याची खळबळजनक घटना सावली वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहाय्यक कार्यालय व्याहाड खुर्द येथे गुरुवारी उघडकीस आली.  विशेष म्हणजे त्याच पेटीमध्ये वाघाचे नख, दात असतानाही चोरट्यांनी त्याला हातही लावला नाही. पोलिसांनी सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सावली अंतर्गत व्याहाड खुर्द येथे क्षेत्र सहायकांचे शासकीय निवासस्थान आहे. त्याच निवासस्थानात क्षेत्र सहायक कार्यालय आहे. येथे क्षेत्र सहाय्यक म्हणून रवी सुर्यवंशी कार्यरत आहेत. परंतु ते २६ ऑगस्टपासून सुट्टीवर गेले आहेत. त्यांचा अतिरीक्त प्रभार पंढरीचे क्षेत्र सहाय्यक अनिल मेश्राम यांच्याकडे आहे.

गुरुवारी सकाळी स्वच्छता कर्मचारी साफसफाई करण्याकरिता गेला असता कार्यलयाच्या दरवाज्याचे समोरील कुलुप तोडून असल्याचे तसेच आतील आलमा-या फोडून त्यातील सामान फेकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती क्षेत्र सहाय्यक अनिल मेश्राम यांना दिली. त्यांनी लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी याबाबतची माहिती सावली पोलीस ठाण्याला दिली.

दरम्यान सावलीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली. यावेळी घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे ठेवलेली टिनाची पेटीचे कुलूप फोडून त्यातील भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनीयम अन्वये सन २०२० मध्ये केलेल्या कारवाईनुसार वाघशिकार प्रकरणी जप्त असलेला नखांसहित असलेला वाघाचा पंजा व दुसऱ्या रूममध्ये ठेवलेला एलीफंट टार्च गायब दिसला. पोलीस व वनविभागाने पंचनामा करून वनपरिक्षेत्र अधिकारी राजूरकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सावलीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. क्षेत्र सहायकाचे निवासस्थान व कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने किचन चे सर्व साहित्य येथे उपलब्ध होते. चोरट्यांनी तेथे चक्क स्वयंपाक बनवून जेवणही केल्याचे घटनास्थळावरील स्थितीवरून समोर आले आहे.आरोपीच्या थुंकीचे नमुने जप्त

 कार्यालयामध्ये अनेक ठिकाणी आरोपीने थुंकले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ते थुंकीचे नमुने यासोबतच एका ठिकाणी फिंगरप्रिंट ही मिळाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभागTigerवाघchandrapur-acचंद्रपूर