शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात एकाच रात्री चोरट्यांनी फोडली तीन दुकाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:41 IST

रोख रक्कम लंपास : चंद्रपूर-नागपूर रोडवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शहरातील नागपूर रोडवरील वडगाव परिसरातील तीन दुकाने शनिवारच्या रात्री चोरट्यांनी फोडली. यामध्ये २ लाख १५ हजाराची रोख रक्कम पळविली. मेन रोडवरील दुकाने फोडल्याने व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

चंद्रपूर-नागपूर रोडवरील वडगाव परिसरामध्ये असलेले पवनसुत इंटरप्राईजेस, चांडक मेडिकल आणि जनार्धन एजन्सी या तिन्ही दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. याप्रकरणी पवनसुत इंटरप्राईजेसचे मालक अतुल कुचनकार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पवनसुत इंटरप्राईजेसच्या मागील बाजूचे शटर फोडले. नागपूर येथील व्यावसायिकांना देण्यासाठी त्यांनी रक्कम ठेवली होती. मात्र चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून काऊंटरमध्ये ठेवलेली १ लाख ७० हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर रामनगर पोलिसांना माहिती दिली. विशेष म्हणजे, शनिवारी रात्रीच याच परिसरातील रोहित सुधाकर माडुलवार यांच्या जनार्धन एजन्सीमध्येही चोरट्यांनी हात साफ केला. 

यामध्ये ४५ हजार रुपये चोरून नेले. त्यानंतर बापटनगर चौकामध्ये असलेल्या चांडक मेडिकलचेही शटर तोडून ३५ हजार रुपये लंपास केले. यासंदर्भात पवनसुत इंटरप्राईजेसचे अतुल कुचनकार, चांडक मेडिकलचे मोहित चांडक, जनार्धन एजन्सीचे रोहित माडुरवार यांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमांन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

व्यावसायिकांमध्ये भीती वातावरण चंद्रपूर-नागपूर मार्गावर सारखी वर्दळ असते. तिन्ही दुकाने याच मार्गावर आहे. मेन मार्ग असतानाही चोरट्यांनी चोरीचे धाडस केल्याने व्यावसयिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. 

सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद शनिवारी एकाच रात्री तीन दुकाने फोडल्याची घटना दुकानांतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. यामध्ये चोरटे अंगावर शाल ओढून असून तोंड बांधलेले आहे. विशेष म्हणजे, दुकानांतील इतर साहित्य न चोरता केवळ पैसे चोरून नेले आहे.

टॅग्स :Robberyचोरीchandrapur-acचंद्रपूरCrime Newsगुन्हेगारी