शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीसाठी ‘ते’ बनले चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:36 IST

आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी व तिला वेगवेगळे महागडे बक्षीस घेऊन देण्यासाठी प्रेमवीराने वाहन चोरी सुरु केली. मात्र पोलिसांना याची चुणूक लागताच त्यांनी एका अल्पवयीन बालकासह दोघांना अटक करुन त्यांच्याजवळून चोरीची सहा वाहने जप्त केली.

ठळक मुद्देसहा वाहने जप्त : दोन चोरट्यांसह एका बालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी व तिला वेगवेगळे महागडे बक्षीस घेऊन देण्यासाठी प्रेमवीराने वाहन चोरी सुरु केली. मात्र पोलिसांना याची चुणूक लागताच त्यांनी एका अल्पवयीन बालकासह दोघांना अटक करुन त्यांच्याजवळून चोरीची सहा वाहने जप्त केली. तपासादरम्यान प्रेयसीला खुश करण्यासाठी चोरी करीत असल्याचे त्यांनी कबुल केले. असलम अबरार अंसारी (२१) आकाश अरविंदसिंग राजपूर (१९) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.माजरी पोलीस ठाण्यांतर्गत मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. माजरी कुचना वसाहत परिसरात अनेक दुचाकी चोरीच्या तक्रारीची माजरी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात दुचाकी चोरट्यांचा तपास सुरु होता. असलम अबरार अंसारी, आकाश अरविंदसिंग राजपूत या दोघांनी चोरी केलेली वाहने माजरी येथील वॉर्ड क्रमांक ५ मधील एका अल्पवयीन बालकाच्या घरी लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन बालकाच्या घरी छापा टाकला.यावेळी चोरीच्या तीन वाहनांसह अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. तपासादरम्यान अल्पवयीन बालकाने असलम व आकाश या दोघांची नावे सांगितली. त्यांनतर त्यांनाही पोलिसांनी अटक केली. असलम अबरार अंसारी याने प्रेयसीला खुश करण्यासाठी प्रेयसीच्या दोन भावांना चोरीच्या दुचाकी भेट दिली, तर आकाश राजपूत याने प्रेयसीला दुचाकी भेट दिल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरट्यांकडून दोन लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सयद अहमद, हरिदास चोपणे, प्रफुल्ल गारघाटे, श्रीकांत मोगरम यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Thiefचोर